Instagram hidden word feature : छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामचे मोठ्या प्रमाणात वापर होते. त्यातील फिल्टर्स आणि अनेक भन्नाट फीचर्स हे युजर्सना भूरळ घालतात. म्हणून इन्स्टाग्रामवर युजर्सची भरपूर वर्दळ असते. मात्र अनेकदा युजरला या व्यासपीठावर अपमानास्पद टिप्पणींना देखील तोंड द्यावे लागते. यामुळे आत्मविश्वास खचतो आणि पुढल्यावेळेस काही शेअर करण्याआधी भीती वाटायला लागते. काही मुद्दाम देखील नकारात्मक टिप्पणी करतात. म्हणून अशा टिप्पण्यांना टाळण्यासाठी इन्स्टाग्राममध्ये एक अफलातून फीचर आहे.

हिडन वर्ड्स असे या फीचरचे नाव आहे. त्याच्या सहायाने अपमानास्पद शब्द हाईड करता येतात. हिडन वर्ड फीचर सुरू केल्यावर अपमानास्पद टिप्पण्या येण्याच्या प्रमाणात ४० टक्के घट दिसून येईल, असा कंपनीचा दावा आहे.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

(आता व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार पॅन, ड्रायव्हिंग लासन्ससह इतर कागदपत्रे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

काय आहे हिडन वर्ड फीचर?

हिडन वर्ड फीचर सुरू केल्यानंतर इन्स्टाग्राम अपमानास्पद कमेंट. इन्स्टाग्राम स्वत:हून त्याच्या माहितीच्या आधारावर आक्षेपार्ह शब्द, कमेंट लपवते. आक्षेपार्ह कमेंट तुमच्या पोस्वटर शेअर झाल्यावर इन्स्टाग्राम हे कमेंट लपवते. ते केवळ तुम्हालाच दिसेल, इतर लोकांना दिसणार नाही.

इन्स्टाग्राम त्याला माहिती असलेले आक्षेपार्ह शब्द लपवतो. मात्र, प्रादेशिक भाषेमध्ये कमेंट आल्यास त्याला कोणते शब्द आक्षेपार्ह आहे, हे कसे कळेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, हिडन वर्डमध्ये त्यावरही उपाय आहे. तुम्ही स्वत: आपल्या प्रादेशिक भाषेत बोलल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह शब्दांची नोंद हिडन वर्ड फीचरमधील कस्टम वर्ड आणि फ्रेजेसमध्ये करू शकता. त्यानंतर कोणी प्रादेशिक भाषेमध्ये त्या शब्दाचा वापर केला तर ते शब्द, इमोजी असलेले कमेंट लपवले जाईल.

(गुगलने होमपेजवर टाकले ‘हे’ भन्नाट फीचर, छायाचित्राचा स्त्रोत शोधण्यात करेल मदत, अधिक माहितीही मिळेल)

हिडन वर्ड सुरू करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  • इन्स्टाग्राम अ‍ॅप सुरू करा
  • प्रोफाईल पिक्चरवर टॅप करून तुमची प्रोफाईल उघडा.
  • त्यानंतर वरती उजवीकडे तीन आडव्या रेषांवर टॅप करा.
  • सेटिंग टॅबमध्ये जा.
  • प्रायव्हसी ऑप्शन निवडा.
  • हिडन वर्ड पर्यायावर टॅप करा.
  • ऑफेन्सिव्ह वर्ड आणि फ्रेजेस टॅब अंतर्गत हाईड कमेंट, अडव्हान्स्ड कमेंट फिल्टरिंग आणि हाईड मेसेज रिक्वेस्टसाठी टोगल ऑन करा.

असे केल्यानंतर तुमच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट राहील मात्र ते इतरांना दिसून येणार नाही. तसेच युजर स्वत: देखील त्यांना कमेंटमध्ये नको असलेले शब्द, आकडे, इमोजी आणि वाक्ये हिडन वर्ड यादीमध्ये टाकू शकतात. नंतर तसे शब्द असलेले कमेंट लपवले जाईल, ते इतरांना दिसणार नाही.