Users Can Schedule Instagram DM : अल्पवाधीत तरुणांच्या आणि नेटकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या इन्स्टाग्रामवर सातत्याने नवनवे बदल होत आहेत. वापरकर्त्यांना सोयीचे आणि उपयुक्त ठरतील असे बदल सातत्याने केले जातात. त्यामुळे व्हिडिओ, मिम्स आणि फोटो शेअर करण्यासाठी इन्स्टाग्राम प्रसिद्ध आहे. आता इन्स्टाग्रामने नवं फिचर आणलं आहे. यामुळे वापरकर्ते डीएम शेड्युल करू शकणार आहेत.
इन्स्टाग्रामवर मेसेज शेड्युल करण्याची सोय केल्याने याचा फायदा बऱ्याच वापरकर्त्यांना होणार आहे. विशिष्ट वेळी मिम्स शेअर करू इच्छिणाऱ्या किंवा विशिष्ट वेळी प्रेक्षकांशी संवाद साधू इच्छिणाऱ्या कंटेट क्रिएटर्सना या फिचरचा फायदा होणार आहे. त्यामुळे, इन्स्टाग्रामवर मेसेज कसा शेड्युल करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर खाली आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहोत.
इंस्टाग्रामवर डीएम कसं शेड्यूल करायचं?
- इंस्टाग्राम सुरू करा आणि होम स्क्रीनवरून उजवीकडे स्वाइप करून किंवा वरच्या उजव्या कोपऱ्यातील मेसेज पर्यायावर टॅप करून डायरेक्ट मेसेजेस (DMs) विभागात जा.
- आता, तुम्हाला ज्या संभाषणासाठी मेसेज शेड्युल करायचा आहे, त्यांचा टेक्स्ट बॉक्स उघडा.
- त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जे टाईप करायचं आहे, ते टाईप करून घ्या.
- सेंड बटण दाबण्याऐवजी, त्यावर जास्त वेळ दाबा आणि एक नवीन “मेसेज शेड्यूल करा” पर्याय दिसेल.
- येथे, तुम्हाला संदेश पाठवायचा असलेली तारीख आणि वेळ सेट करा आणि पूर्ण झाल्यावर निळ्या बटणावर टॅप करा.

इन्स्टाग्राम तुम्हाला २९ दिवस आधी मेसेज शेड्यूल करण्याची परवानगी देतो आणि तुम्ही चॅट उघडता तेव्हा प्रत्येक वेळी संभाषणाच्या तळाशी एक लहान “शेड्यूल्ड मेसेज” बॅनर दाखवेल. जर तुम्ही त्यावर टॅप केले तर एक नवीन स्क्रीन उघडेल जिथे तुम्ही तुमचे सर्व शेड्यूल केलेले मेसेज पाहू शकता.