Instagram Safety : अलीकडची तरुणाई सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असते. दिवसेंदिवस इन्स्टाग्राम या अॅपचा चाहतावर्ग तसेच अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, सोशल मीडियावर वेळ घालवणं, रील्स पाहणं जेवढं सोपं आहे तेवढंच हॅकर्सपासून सावधान राहणं कठीण आहे. मोठमोठे सेलिब्रिटी असो किंवा राजकीय क्षेत्रातील मंडळी या सगळ्यांना अकाऊंट हॅक होणं, एडिटेड फोटो, आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याने या हॅकिंगचा फटका बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा विशेषत: इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा वापर करताना सावध राहणं गरजेचं आहे.
आपलं इन्स्टाग्राम ( Instagram ) अकाऊंट कोणी दुसरंच वापरत नाहीये ना याची खात्री करून घेण्यासाठी युजर्सला काही सोप्या स्टेप्स फॉलो करून माहिती घेता येईल. तुमचं अकाऊंट कोणी दुसरंच वापरतंय का?, तुमचे चॅट्स लपून कोणीतरी वाचतंय का? अशी थोडीफार शंका जरी तु्म्हाला आली तरी, खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही संबंधित माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : मोमोज, डिम सम आणि डंपलिंगमध्ये नेमका काय फरक असतो?
‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून मिळवा लॉग-इन डिटेल्स
१. तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला इन्स्टाग्राम अॅप ( Instagram ) ओपन करावं लागेल.
२. यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जा… उजवीकडे कोपऱ्यात असणाऱ्या Setting पर्यायावर क्लिक करा.
३. याठिकाणी तुम्हाला सर्चबारमध्ये शोधल्यावर ‘Where You Are Logged In’ हा पर्याय तुम्हाला दिसेल.
हेही वाचा : Blue Zone : ‘ब्लू झोन’ म्हणजे काय? जिथे लोक १०० वर्षे जगतात; जगात ही ठिकाणे कुठे आहेत, तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या!
४. तुमचं अकाऊंट सिलेक्ट करा.
५. अकाऊंट सिलेक्ट केल्यावर, तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकूण किती डिव्हाइसवरून ( मोबाइल, लॅपटॉप, टॅब इ. सर्व) लॉग-इन करण्यात आलंय याची माहिती मिळेल.
६. समजा एखाद्या Unknow डिव्हाइसवरून तुमच्या अकाऊंटवर कोणी लॉग-इन केलं असेल, तर त्या संबंधित डिव्हाइसच्या नावावर क्लिक करा…पुढे, तुम्हाला लॉगआऊटचा पर्याय दिसेल.
७. लॉगआऊटवर क्लिक करून या Unknow डिव्हाइसचा अॅक्सेस तुमच्या अकाऊंटवरून काढून टाका.
८. अशाप्रकारे तुम्ही हॅकिंगपासून सावधानता बाळगू शकता.
महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला ‘Where You Are Logged In’ हा पर्याय दिसत नसेल तर, अकाऊंट सेटिंग्जमध्ये जाऊन पासवर्ड आणि सिक्युरिटी या पर्यायावर जाऊन पुढील प्रक्रिया करा.
दरम्यान, या सोप्या स्टेप्स फॉलो करून आजच तुमचं अकाऊंट ( Instagram ) कोणी दुसरंच वापरत नाहीये ना? याची खात्री करू शकता.