प्रत्येक देशाचे स्वत:चे एक चलन असते. जसे भारताचे अधिकृत चलन रुपया आहे. ज्याचे चिन्ह ₹ आहे. हे चिन्ह हिंदीतील ‘र’ अक्षरासारखे दिसते. ‘रुपया’वरून ‘र’ चिन्ह बनवल्याचे आपल्याला सहज समजते. पण ‘डॉलर’ हे इंग्रजी अक्षर ‘D’ वरून लिहिले जाते. मग त्याचे चिन्ह ‘S’ अक्षरासारखे का आहे? तीच कथा ‘पाउंड’ची आहे जे दर्शवण्यासाठी ‘L’ अक्षरापासून बनवलेले चिन्ह वापरले जाते. या मागचे कारण काय आहे, जाणून घेऊ या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपयावरील ₹ चिन्हाची कथा

अमेरिकन डॉलर आणि ब्रिटिश पौंडबद्दल बोलायचे झाल्यास, अमेरिकेच्या डॉलर चलनाचे चिन्ह $ आणि पौंडचे चिन्ह £ हे आहे. आपल्या देशाच्या चलनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘₹’ चिन्हाबद्दल बोलायचे झाल्यास ते इंग्रजी अक्षर ‘R’ आणि देवनागरी व्यंजन ‘र’ एकत्र करून तयार केले गेले आहे.

भारतीय चलनाचे हे चिन्ह उदय कुमार यांनी डिझाइन केले आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक खुली स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सादर केलेल्या हजारो डिझाइन्सपैकी आयआयटी मुंबईचे पदव्युत्तर विद्यार्थी उदय कुमार यांचे चिन्ह अंतिम झाले.

२०१० मध्ये ₹ हे भारतीय चलनाचे डिझाइन म्हणून अधिकृतपणे घोषित केले गेले. सरकारने हे चिन्ह स्वीकारल्यानंतर वर्षभरात म्हणजेच २०११ मध्ये हे नवीन चिन्ह असलेली नाणी सुरू करण्यात आली.

डॉलरला $ चिन्ह कसे मिळाले?

हिस्ट्री वेबसाइटच्या अहवालानुसार, स्पॅनिश एक्स्प्लोरर्सना दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चांदी सापडली. स्पॅनिश लोक या चांदीचा वापर नाणी बनवण्यासाठी करत होते. ज्याला peso de ocho असे म्हटले जायचे, पण शॉर्टकटमध्ये त्याला ‘pesos’ असे म्हणायचे. त्यासाठी एक चिन्हही निवडले होते. संपूर्ण शब्द लिहिण्याऐवजी त्यांनी ps चिन्ह निवडले, परंतु यामध्ये S हा Pच्या वर होता. हळूहळू फक्त P ची काठी उरली आणि गोल नाहीसा झाला. अशा प्रकारे, Sच्या वर फक्त एक काठी राहिली, जी $ सारखी दिसत होती. म्हणजेच अमेरिकेचे डॉलर हे चिन्ह हा देश निर्माण होण्यापूर्वीच अस्तित्वात आले होते.

पौंड चलनाला £ चिन्ह कसे मिळाले?

लॅटिन भाषेत १ पौंड पैशाला लिब्रा असे म्हटले जाते. या लिब्राच्या L पासून पौंड स्टर्लिंगचे चिन्ह £ बनले.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting facts about currency know how doller pound and indian rupee get their sign sjr