Two Unique Railway Stations Without Names: जगातील सर्वाधिक मोठे रेल्वेचे जाळे म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक आहे. भारतीय रेल्वेने दररोज लाखो-कोटी लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे ही अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. तर काही गोष्टी आपल्या माहिती नसल्याने अत्यंत रोचक, रंजक वाटतात. भारतात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहीत नसते. तुम्हाला माहित आहे का भारतात अशी काही रेल्वेस्टेशन आहेत ज्यांना नावेच नाहीत.
दररोज लोकं रेल्वेने प्रवास करतात. यासाठी देशात अनेक ठिकाणी रेल्वे स्थानके बांधण्यात आली आहेत. त्या सर्व रेल्वे स्थानकांनाही नावे आहेत, परंतु देशातील अशी दोन रेल्वे स्थानके आहेत ज्यांना अधिकृत नाव देण्यात आलेले नाही, आजही तेथे साइन बोर्ड रिकामाच आहे. खरंतर रेल्वे स्टेशनवर त्या स्टेशनच्या नावाचा साइन बोर्ड असतो. म्हणजे प्रत्येक रेल्वे स्टेशनला एक नाव असतं. पण भारतात दोन असे रेल्वे स्टेशन आहेत. ज्याला नावाच नाही, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कुठे आहेत हे स्टेशन, जाणून घेऊया…
देशातील प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात अनेक रेल्वे स्थानके आहेत आणि त्या सर्वांची अधिकृत नावे देखील आहेत. परंतु याशिवाय दोन रेल्वे स्थानके आहेत ज्यांना अधिकृत नाव नाही. पहिले रेल्वे स्टेशन झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात आहे. या रेल्वे स्थानकाला आजपर्यंत नाव देण्यात आलं नाही. जेव्हा तुम्ही रांची ते तोरी या ट्रेनने प्रवास करता तेव्हा तुम्हाला हे अज्ञात रेल्वे स्टेशन वाटेत दिसेल.
मिळालेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये जेव्हा रेल्वेने याचा वापर सुरू केला तेव्हा त्याचे नाव बदकीचंपी ठेवण्यात आले होते, परंतु तेथील स्थानिक लोकांनी काही मुद्द्यावर विरोध करण्यास सुरुवात केली, त्यामुळे रेल्वेने हे नाव अधिकृत केले नाही आणि आजही ते तसेच आहे. हे रेल्वे स्टेशन नावाशिवाय आहे.
त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये आणखी एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याला नाव नाही. हे रेल्वे स्टेशन बांकुरा-मसग्राम रेल्वे मार्गावर येते, हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या वर्धमानपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव आधी रायनगर असे होते, मात्र, येथेही स्थानिक लोकांनी विरोध केल्याने रेल्वेला हे नाव हटवावे लागले. तेव्हापासून वाद सुरुच आहे. हे स्थानक अजूनही नावाशिवाय सुरू आहे. स्थानकाला स्वतःचे नाव नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, अजूनही रायनगर या जुन्या नावाने या स्टेशनसाठी तिकीट मिळते.