International Carrot Day 2023 : दरवर्षी 4 एप्रिल हा दिवस जागतिक गाजर दिन म्हणून साजरा केला जातो. गाजराच्या फायद्यांबद्दल लोकांना जागरुक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. सध्या फास्ट फूड खाण्याचा जणू ट्रेण्ड सुरु आहे. प्रत्येक गल्लोगल्लीत फास्ट फूडचे स्टॉल आणि दुकाने दिसून येतात. संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी या दुकानांवर प्रचंड गर्दी निर्माण होते. तरुणाई सध्या मोमोजची दिवानी झाली आहे. लोकांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.चला तर मग जाणून घेऊया गाजराच्या विविध जाती, त्याचे फायदे आणि त्यासंबंधित काही रंजक गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय गाजर दिवसाचा इतिहास –

आंतरराष्ट्रीय गाजर दिवस २००३ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि २०१२ पासून तो जगभरात साजरा होऊ लागला. आंतरराष्ट्रीय गाजर दिन हा फ्रान्स, स्वीडन, इटली, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डमसह अनेक देशांमध्ये साजरा करतात. गाजराची लागवड प्रथम आशियातील लोकांनी सुरु केली त्यानंतर ती जगभरात सुरु झाली. सुरुवातीला पंजाब आणि काश्मीरमधील डोंगराळ भागात गाजराची लागवड सुरु झाली. त्यावेळी लाल, पिवळा, केशरी आणि काळा अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये गाजर आढळले.

गाजर खाण्याचे फायदे –

गाजरामध्ये असणाऱ्या कॅरोटीनॉइड्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम ह्या घटकाचे प्रमाण गाजरामध्ये भरपूर असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. यामुळे दातांचे आरोग्य देखील चांगले राहते.

त्वचा –

गाजरात असलेले बीटा-कॅरोटीन हे एक प्रभावी अँटी-ऑक्सिडेंट आहे ज्यामुळे त्वचा चांगली राहते. गाजराच्या रसात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. 

हृदयासाठी फायदेशीर –

गाजर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यांच्यातील अँटिऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर असतात. याशिवाय गाजरात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. गाजरात आढळणारे फायबर वजन नियंत्रणात ठेवते आणि हृदयविकाराची शक्यता कमी करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते –

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजर मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यास मदत करते जे रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International carrot day 2023 history significance celebration of carrot day srk
Show comments