दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या लोकांचं जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात या दिवसाचं महत्त्व, इतिहास आणि या वर्षीच्या थीमबद्दल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास काय सांगतो?

डिसेंबर १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला. हा दिवस अंमली पदार्थांचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवसाचे महत्व काय?

हा दिवस पाळण्यामागे जगभरातील खासकरून लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असतो. जगभरातील शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच ड्रग्ज आणि त्याच्या सेवनाच्या जोखमीविषयी माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.

२०२१ या वर्षाची थीम काय?

‘जीवन वाचवण्यासाठी अंमली पदार्थांशी संबंधित माहिती शेअर करा’ अशी यंदाची थीम आहे. या थीमसह अनेक पोस्टर, चित्रे सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. कोविड -१९ मुळे आपल्याला मोठी शिकवण मिळाली आहे की आपण एकत्रपणे कोणत्याही समस्येला किंवा आपत्तीला सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच हा दिवस म्हणजे जगभरातील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, सामाजिक आणि इतर संघटना व सरकार यांनी एकत्र येऊन ड्रग्जच्या आधीन गेलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी ऐक्य दाखवण्याची संधी आहे. तज्ञांचे मत आहे की या आव्हानाला तोंड देण्यासाठी सगळयांनी एकत्र येऊन मदत करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International day against drug abuse and illicit trafficking 2021 ttg