अलीकडेच वंदे भारत ट्रेनमध्ये एका व्यक्तीने सिगारेट ओढल्याचे प्रकरण समोर आले होते. सिगारेट ओढण्यासाठी तो व्यक्ती ट्रेनच्या बाथरुममध्ये गेला, पण त्याला संपूर्ण ट्रेनमध्ये स्मोक सेन्सर्स बसवले आहेत याची कल्पना नव्हती. त्याने सिगारेट पेटवताच स्मोक सेन्सर्स सुरु झाले आणि अलर्ट अलार्म वाजू लागला. यानंतर संपूर्ण कोचमध्ये एरोसोल स्प्रे सुरू झाला. इतर प्रवाशांनी घाबरून आपत्कालीन फोनद्वारे गार्डला माहिती दिली. या प्रवाशाबाबत एक मजेशीर बाब म्हणजे वंदे भारत ट्रेनमधून तो विना तिकीट प्रवास करत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिला म्हणजे, ट्रेनमध्ये धूम्रपान करण्यास परवानगी आहे का? जर नसेल तर ट्रेनमध्ये धूम्रपान करणाऱ्यांविरोधात काय कायदा आहे? दुसरा म्हणजे, ट्रेनमध्ये धूम्रपान करताना आढळल्यास शिक्षेची काय तरतूद आहे? आणखी एक प्रश्न म्हणजे ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कायद्यात कोणती शिक्षा आहे? आता या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ…

ट्रेनमध्ये धूम्रपान करण्याविरोधात कोणता कायदा आहे?

ट्रेनच्या डब्ब्यात धूम्रपान करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १६७ नुसार गुन्हा आहे. एखादा प्रवासी असे करताना आढळल्यास त्याच्यावर १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जाऊन सिगारेट प्यायल्यास कोणतीही शिक्षा होत नाही असे नाही. तुम्ही ट्रेनमध्ये कुठेही सिगारेट, बिडी, लाइटिंग मॅच, दारु पिण्यास मनाई आहे. दोषी व्यक्तींवर वरील कायद्यानुसारच शिक्षा केली जाते. पण, भारतीय रेल्वे बोर्डाने या संदर्भातील आरोपींवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार रेल्वे संरक्षण दल आणि तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना शून्य सहनशीलता धोरणाअंतर्गत दिले आहेत.

या सर्व ज्वलनशील पदार्थ्यांमुळे ट्रेनमध्ये आग लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून ट्रेनमध्ये धू्म्रपान करण्यास कायद्याने परवानगी नाही.

विना तिकीट प्रवास केल्यास काय शिक्षा होते?

रेल्वे कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत विना तिकीट आणि वैध पासशिवाय प्रवास करणाऱ्यांविरोधात शिक्षेची तरतूद आहे. कोणतीही व्यक्ती असे करताना आढळल्यास तिच्याकडून प्रवास केलेल्या अंतराचे भाडे आकारले जाईल किंवा ट्रेन सुरू झालेल्या ठिकाणापासून ते व्यक्ती पकडला गेलेल्या स्थानकापर्यंतची रक्कम वसूल केली जाईल, यापेक्षा जास्त म्हणजे २५० रुपये किंवा तिकीट भाड्याची डबल रक्कम वसूल केली जाईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc indian railways cigarette smoking is prohibited in trains offenders can be fined 500 rupees or imprisonment know the rules sjr
Show comments