लांबच्या अंतरावरील प्रवासासाठी रेल्वे हा नेहमीच आरामदाय आणि उत्तम पर्याय ठरतो. खासगी वाहनाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास कमी खर्चामध्ये आणि सुरक्षितपणे करता येतो. पण आपण संपूर्ण रेल्वेगाडी आणि एक पूर्ण बोगी आरक्षित करु शकतो का? खरचं हे शक्य आहे की नाही असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेलच. तर या प्रश्नाचे उत्तर आहे होय. आपण असे करु शकतो.
आता प्रश्न असा बाकी राहतो की अशा प्रकारचे आरक्षण करणे शक्य असेल तर ते कसे करता येईल? संपूर्ण बोगी किंवा रेल्वेचा एक डब्बा आरक्षित करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आहे का? चला या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या.
संपूर्ण रेल्वेचे किंवा बोगीसाठी आरक्षण कसे करावे? जाणून घ्या
- आयआरटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला ( http://www.ftr.irctc.co) भेट द्या.
- तिथे एफटीआर सर्व्हिस या पर्याय निवडा जर तुम्हाला संपूर्ण बोगीसाठी आरक्षण करायचे असेल तर.
- तुम्हाला शुल्क भरण्यासाठी दिलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- पैसे देण्यासाठी दिलेल्या पर्याय निवडा.
हेही वाचा : IRCTC Sick Rules: धावत्या रेल्वेमध्ये प्रवासी आजारी पडल्यास उपचार कसे मिळवावे? जाणून घ्या सविस्तर
संपूर्ण रेल्वे किंवा बोगी आरक्षित करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?
- एका डब्याचे आरक्षण करण्यासाठी ५०,००० रुपये सुरक्षा रक्कम देणे आवश्यक आहे.
- १८ डब्यांची संपूर्ण ट्रेन आरक्षित करण्यासाठी ९ लाख रुपये सुरक्षा ठेव जमा करणे आवश्यक आहे.
- ७ दिवसांनंतर स्टॉपेज फीसाठी प्रत्येक डब्ब्यासाठी १०,००० रुपये अतिरिक्त भरावे लागतील
हेही वाचा : कमी खर्चात घ्या अयोध्या आणि वैष्णोदेवीचे दर्शन! रेल्वेने दिली सुवर्णसंधी, फक्त ‘एवढे’ भाडे भरा
तुम्हाला हवे असल्याल तुम्ही डब्यांची संख्या २४ पर्यंत वाढवू शकता. तुम्ही ऑनलाइन अर्ज केला पाहिजे आणि संपूर्ण ट्रेन आरक्षित करण्यासाठी ३० दिवस ते ६ महिने अगोदर तयारी केली पाहिजे.