IRCTC Refund Policy: सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कठीण असते आणि बऱ्याच वेळा बुक केलेली वेटिंग तिकीटदेखील नेहमीच ‘कन्फर्म’ होईल याची शाश्वती नसते. तरीही बऱ्याच वेळा प्रवासी आपली प्रवासाची योजना बदलल्यामुळे तिकीट रद्द करतात. मग त्या रद्द केलेल्या तिकिटाच्या रकमेतून भारतीय रेल्वे प्रशासनाकडून वेळेवर आधारित रद्दीकरण शुल्क वजा करण्यात येते. आरक्षित केलेले रेल्वे तिकीट रद्द करताना कापल्या जाणाऱ्या विविध शुल्कांबाबतही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. म्हणून तिकीट रद्द करताना आकारल्या जाणाऱ्या रद्दीकरण शुल्काविषयीची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

जर तुम्ही रेल्वेची ‘कन्फर्म’, ‘आरएसी’ किंवा ‘वेट लिस्टेड’ तिकीट रद्द केली, तर तुम्हाला रद्दीकरण शुल्क भरण्याची तयारी ठेवावी लागेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे रद्दीकरणाचा वेळ जितका जवळ असतो तितकेच शुल्क जास्त असते. आणि हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की, हे शुल्क समान नसून तुमचे तिकीट कोणत्या ‘दर्जा’चे आहे त्यानुसार रद्दीकरण शुल्क वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ- लक्झरियस एसी फर्स्ट क्लास, कम्फर्टेबल एसी चेअर कार किंवा इकॉनॉमिकल सेकंड क्लास.

हेही वाचा… IRCTC Tatkal Booking : पैसे न अडकता कसे काढावे तत्काळ तिकीट? जाणून घ्या योग्य पद्धत

रेल्वे प्रवाशांनी लक्षात ठेवावे की, तिकीट रद्द करण्यासाठी चार्ट तयार होण्याआधी आणि दुसरी चार्ट तयार झाल्यानंतर, असे दोन प्रकार आहेत. त्यावरून तुम्हाला किती रिफंड मिळू शकेल हे ठरते.

कन्फर्म तिकिटे आगाऊ रद्द करणे :

जर तुम्ही ट्रेन प्रवासाच्या सुरुवातीच्या स्टेशनहून ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी तिकीट रद्द केले, तर कापले जाणारे प्रति प्रवासी रद्दीकरण शुल्क खालीलप्रमाणे असेल :

  • एसी फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह क्लास प्रवाशांसाठी २४० रुपये.
  • एसी 2-टियर/फर्स्ट क्लाससाठी २०० रुपये.
  • एसी 3-टियर/एसी चेअर कार, एसी-3 इकॉनॉमीसाठी १८० रुपये.
  • सेकंड क्लाससाठी ६० रुपये.

जर तुम्ही कन्फर्म तिकीट ४८ तासांपेक्षा कमी; पण १२ तासांपेक्षा अगोदर रद्द केले, तर संपूर्ण भाडे शुल्कातून २५% रद्दीकरण शुल्क वजा होईल (पण प्रत्येक क्लाससाठी किमान एक ठराविक रद्दीकरण शुल्क लागेल).

हेही वाचा… Aadhaar Card Updates: आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकतो? याबाबत काय आहेत नियम? जाणून घ्या

तुम्ही जर कन्फर्म तिकीट १२ तासांपेक्षा कमी वेळ अगोदर आणि ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी रद्द केलं, तर रद्दीकरण शुल्क पूर्ण भाड्यातून ५०% वजा होईल (पण प्रत्येक क्लाससाठी किमान एक ठराविक रद्दीकरण शुल्क लागेल).

जर तुमच्याकडे आरएसी किंवा वेट लिस्टेड तिकीट असेल, तर तुम्ही ते रद्द करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी ते रद्द करावे लागेल. अगदी तुमचा प्रवास कितीही लांबचा असला तरी.

Story img Loader