रेल्वेने प्रवास करणे आपल्याकडे सामान्य गोष्ट आहे. फिरण्यासाठी किंवा विविध कामांसाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. जर तुम्ही रेल्वेने नेहमी प्रवास करत असाल तर माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज काल हवामानाचा काही अंदाज लावणे शक्य नाही, पण त्यामुळे बऱ्याचदा आपली तब्येत खराब होते. आता अशामध्ये रेल्वेच्या प्रवासादरम्यान तुमची तब्येत खराब झाली तर तुम्ही काय कराल.
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांची तब्येत बिघडते आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही काय कराल? जाणून घ्या
तसे, डॉक्टरांची सुविधा आता सर्व रेल्वेमध्ये उपलब्ध आहे. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील आणि लवकरच तुम्ही रेल्वेमध्ये उपस्थित डॉक्टरांशी संपर्क साधून तुमचे उपचार करून घेऊ शकाल.
रेल्वेने प्रवास करताना आजारी पडल्यास या गोष्टींचे करा पालन
- सर्वप्रथम, तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आणि रेल्वेच्या १३८ क्रमांकावर संपर्क साधा.
- त्यानंतर लगेच कंडक्टर किंवा टीटीईला कळवा.
- जर 138 वरील कॉल काम करत नसेल तर तुम्ही या नंबरवर ९७९४८३४९२४ वर संपर्क साधा.
- तसे, टीटीईला डॉक्टर आणि आपत्कालीन सर्व प्रशिक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत टीटीईने आजारी व्यक्तीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचा मृत्यू झाला, तर टीटीईवर कारवाई केली जाईल.
- त्याबरोबर, ट्विटरवर आयआरसीटीसीला टॅग करून, तुमचा पीएनआर आणि इतर तपशील देऊन तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी रेल्वेला माहिती देऊ शकता.
- तसचेट, आता नवीन प्रणाली अंतर्गत रेल्वेमध्ये डॉक्टरांसाठी स्वतंत्र डब्बा असेल जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.
- प्रवाशांच्या मदतीसाठी १६२ गाड्यांमध्ये नवीन मेडिकल बॉक्सही बसवण्यात आले आहेत. यामध्ये प्रवाशांसाठी ५८ प्रकारची औषधे, प्राथमिक उपचाराशी संबंधित सर्व काही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा : बाथरुममधील बेसिन असो किंवा कमोड…सहसा पांढऱ्या रंगाचे का असते? जाणून घ्या शास्त्रीय कारण
आता या सर्व गोष्टींचे पालन करून पुढील स्टेशनवर उपस्थित असलेले डॉक्टर तुमच्या सीटवर येतील. मात्र, ट्रेनमध्ये डॉक्टरांना बोलावण्यासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. त्याची फी आता 5 पट वाढवण्यात आली आहे.