आयआरसीटीसीची (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) वेबसाइट मंगळवारी सकाळी अचानक ठप्प झाली. यामुळे अनेक प्रवाशांना तिकीट काढताना अडचणींचा सामना करावा लागला. तिकीट बुकिंगसाठी पैसे भरल्यानंतरही तिकिटं बुक होत नसल्याची तक्रारी वापरकर्ते करत आहेत. आयआरसीटीसीने याला तांत्रिक समस्या म्हटले आहे.
यानंतर आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर अकाउंटरून या समस्येबाबत माहिती दिली आहे. आयआरसीटीसीने लिहिले की, तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा ठप्प झाली आहे. आमची आयटी टीम या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. ही समस्या दूर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ…
पण अशावेळी तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीशिवाय अनेक दुसरे अॅप्स आहेत, याबाबत खुद्द आयआरसीटीसीने माहिती दिली आहे. प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक कारणांमुळे तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅप्सवर तिकीट बुकिंग सेवा मिळणार नाही, पण यावेळी दुसऱ्या कोणत्या अॅप्सचा वापर करायचा जाणून घेऊ..
तुम्ही तिकीट बुकिंगसाठी Amazon, Make My Trip सारख्या B2C प्लेयर्सवरून तुम्ही तिकीट बुक करु शकता.
Make My Trip वरुन करा तिकीट बुक
तिकीट बुकिंगसाठी तसेच सहलीच्या नियोजनासाठी ही वेबसाइट खूप लोकप्रिय आहे. येथून तुम्ही केवळ तिकिटेच बुक करू शकत नाही तर हॉटेल, कॅब, ट्रेन, बस आणि फ्लाइट तिकीट देखील बुक करु शकता, तुमच्या प्रवासाशी संबंधित जवळपास सर्व सुविधा येथे मिळतात. येथून तुम्हाला आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगची देखील सुविधा आहे.
ixigo
ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी ixigo हा एक उत्तम पर्याय आहे. येथून, ट्रेनशी संबंधित सर्व माहितीसह, तुम्हाला तिकीट बुकिंगची सुविधा देखील मिळते.
ट्रेन मॅन
हे अॅप अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे. येथून तुम्ही ट्रेनमध्ये सीटची उपलब्धता आणि तिकीट बुकिंग दोन्ही करू शकता. एवढेच नाही तर त्यावर पीएनआर स्टेटस आणि कोचची स्थिती तपासणे यासारखी माहिती उपलब्ध आहे.
पेटीएम
पेटीएमचा वापर मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन पेमेंटसाठी करतात. तुम्ही येथून रेल्वे तिकीटही बुक करू शकता. तुम्हाला अॅपवरच रेल्वे तिकीट बुकिंगचा वेगळा पर्याय मिळेल, केवळ पेटीएमच नाही तर तुम्हाला Amazon Pay, PhonePe आणि इतर ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर ट्रेन तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते.