IRCTC May 2023 Trains Confirm Ticket : काय मग चाकरमानी मंडळी, यंदा मे महिन्यात गावाला जायचंय की नाही? कोकणातच काय भारतीय रेल्वेने अगदी कुठेही प्रवास करायचा असला तरी साधारण महिनाभर आधी बुकिंग करावं लागतंच. दिवसाला कोट्यवधी प्रवाशांना घेऊन धावणारी भारतीय रेल्वे रिकामी कधीच नसते. म्हणूनच रेल्वेचं तिकीट बुकिंग आणि त्यातही कन्फर्म तिकीट बुकिंग करून देणाऱ्या माणसाला खूप भाव असतो. पण तुम्हाला माहित आहे का, रेल्वेचे काही नियम तुम्ही स्वतः जाणून घेतले तर तुम्हीही अगदी गर्दीच्या सीझनमध्ये सुद्धा कन्फर्म तिकीट मिळवू शकता. यातील बहुतांश नियम तर रेल्वेच्या तिकिटावरच लिहिलेले असतात पण समस्या अशी की हे नियम शॉर्टफॉर्म च्या रूपात लिहिले जातात त्यामुळे अर्ध्याहून अधिकांना कळतच नाहीत. आज आपण असाच एक कन्फर्म तिकीट मिळवून देणारा व तुमचे पैसे वाचवू शकणारा शॉर्ट फॉर्म जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही जर तुमच्या ट्रेनचा तिकीट नीट पाहिलंत तर त्यात काही वेळा CURR_AVBL असे लिहिलेले आढळून येते. रेल्वेतर्फे कन्फर्म तिकिटांची यादी ही प्रवास सुरु होण्याच्या चार तास आधी बनवली जाते. त्यात काही बर्थ या रिकाम्याच असतात ज्या अगदी शेवटच्या क्षणी काही पॅसेंजरसाठी दिल्या जातात. CURR AVBL असे लिहिलेल्या तिकिटाचा अर्थ हाच होतो की, आरक्षित तिकिटांची अंतिम यादी तयार झाल्यावर उपलब्ध असणाऱ्या जागांसाठी तिकीट. तुम्ही प्रवास सुरु होण्याच्या निदान अर्धा तास आधी नियमित दरांमध्ये या तिकीट कन्फर्म करून घेऊ शकता.

IRCTC मध्ये curr_avbl तिकीट बुकिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे

  • आयआरसीटीसी किंवा रेल्वे आरक्षण काउंटरवर curr avbl बुकिंग ऑनलाइन केले जाऊ शकते.
  • या कोट्याअंतर्गत फक्त कन्फर्म तिकिटेच बुक केली जातील आणि बुक केलेली तिकिटे रद्द करता येणार नाहीत.
  • ज्येष्ठ नागरिक आणि अपंग सवलत वगळता कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
  • सर्व वापरकर्त्यांना तसेच एजंटना बुकिंग करण्याची परवानगी आहे
  • फक्त ई-तिकीट बुकिंगला परवानगी आहे.

हे ही वाचा<< भारतीय रेल्वेच्या ‘या’ स्थानकात रोज प्रवासी तिकीट काढतात पण प्रवास करतच नाहीत! कारण वाचून म्हणाल, “किती हुश्शार”

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास इतरांसह शेअर करायला विसरू नका!

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc trains confirm ticket curravbl meaning indian railway facts to give you fix berth and saves money how to use svs