भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यावधीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवते. यामुळे तुम्हीदेखील रोज ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने काही प्रवाशांसाठी तिकीट भाड्यात ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.
भारतीय रेल्वे वेगवेगळ्या कोचनुसार वेगवेगळे भाडे आकारते. पण, काही निवडक प्रवाशांनाही तिकीट भाड्यात सूट देते. यात आता दिव्यांगजन, मतिमंद, दृष्टिहीन आणि अशा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशिवाय प्रवास करू शकत नाहीत, त्यांना रेल्वे तिकिटात सवलत देते. अशा लोकांना जनरल क्लास, स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. तर 1AC आणि 2AC चा पर्याय निवडणाऱ्यांना ५० टक्के सूट दिली जाते. तसेच थर्ड एसी आणि एसी चेअर कारमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. अशा व्यक्तीसोबत जाणाऱ्या एस्कॉर्टलाही रेल्वेच्या तिकिटांवर तेवढीच सूट मिळते.
यात राजधानी आणि शताब्दीसारख्या प्रीमियम ट्रेन 3AC आणि AC चेअर कारवर २५ टक्क्यांपर्यंत सूट देतात. ज्या प्रवाशांना ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही, त्यांना त्यांच्या रेल्वे तिकिटावर ५० टक्के सूट मिळते. त्यांच्या सोबत येणाऱ्या सोबतीलाही तेच फायदे मिळतात.
हेही वाचा – भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! आता ‘हा’ कोच होणार जनरल कोच? काय आहे आदेश, वाचा
अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना रेल्वे ट्रेनच्या तिकिटांवरही सवलत मिळते. त्यात कर्करोग, थॅलेसेमिया, हृदयरोग, किडनीच्या समस्येने ग्रस्त रुग्ण, हिमोफिलियाचे रुग्ण, टीबीचे रुग्ण, एड्सचे रुग्ण, ऑस्टोमी रुग्ण (मलमूत्र विसर्जनाची जागेत गुंतागुंत निर्माण झाल्यास त्याची नैसर्गिक रचना शस्त्रक्रियेद्वारे बदलणे) ॲनिमिया, अॅप्लास्टिक अॅनिमियाचे (शरीरात रक्ताची कमतरता असणे) रुग्ण यांचाही समावेश आहे.