पृथ्वीवर पडणारी कोणतीही वस्तू थेट जमिनीवरच येऊन आदळते आणि हे का घडतं? याचा सफरचंदाशी नेमका काय संबंध आहे, हेही सगळ्यांना ठाऊक आहे.

जगातील काही ठिकाणं किंवा वस्तू खूप प्रसिद्ध होतात, ज्यामुळे ती नावं आपोआपच विशेषनामं ठरतात. उदाहरणार्थ, बोधिवृक्ष म्हटलं की गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेला वृक्ष डोळ्यासमोर येतो. शमीचं झाड म्हटलं की पांडवांनी आपली शस्त्रं लपवलेलं झाड आठवतं. त्याचप्रमाणे, सफरचंदाचं झाड म्हटलं की न्यूटन आणि त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आठवतो. न्यूटनला सफरचंद पडल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचं तत्त्व समजलं आणि त्याने या निसर्गाच्या बलाचा अभ्यास करून त्याचं रहस्य उलगडलं.

**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…

अधिक वाचा: ४५०० वर्षांपूर्वी कोणी बांधले इजिप्तमधले पिरॅमिड?

पण हे झाड आहे तरी कुठे?

जर तुमच्या मनात असं प्रश्न येत असेल की हे ख्यातनाम सफरचंदाचं झाड नक्की कुठे आहे, तर ते स्वाभाविक आहे. डॉ. बाळ फोंडके यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा न्यूटन इंग्लंडमधील लिन्कनशायर परगण्यातील ग्रॅनथॅम गावात राहत होता. ते घर त्याचं बालपणापासूनच होतं, आणि त्याच्या अंगणातच हे सफरचंदाचं झाड होतं. गेली ४०० वर्षं हे झाड तिथंच उभं आहे. इंग्लंडच्या नॅशनल हेरिटेज ट्रस्टने ते घर ताब्यात घेतलं आणि त्याची निगा राखायला सुरुवात केली. त्या बरोबर या झाडाची देखील निगराणी केली जाते. मात्र, अनेक पर्यटक त्या झाडाला भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे झाडाच्या मुळांना हानी पोहचत आहे. दरवर्षी साधारणतः ३३००० पर्यटक या ठिकाणाला भेट देतात, ज्यामुळे झाड उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठीच झाडाभोवती संरक्षक कुंपण घालून पर्यटकांना विशिष्ट अंतरावरच थांबण्यासाठी उपाय योजले जात आहेत.

अधिक वाचा: वडिलांशिवाय जन्माला आलेली ‘डॉली’ कोण होती?

रंजक इतिहास

या झाडाची एक फांदी घेऊन अंतराळवीर पीअर्स सेलर्स यांनी अटलांटिक स्पेस शटलमधून अवकाशात झेप घेतली होती. ज्या झाडाच्या फळामुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचं ज्ञान झालं, त्याच झाडाची फांदी आता गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणात गेली आहे. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने हा प्रयोग केला. या झाडाचं एक रोपटं जयंत नारळीकरांनी पुण्यातील आयुकाच्या प्रांगणात लावलं होतं, पण काही वर्षांनी ते मरून गेलं. कारण इथलं वातावरण सफरचंदाला मानवलं नाही.