ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Live Updates : चांद्रयान ३ ( Chandrayaan 3)चे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे चांद्रयान ३ हे चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यापेक्षा चंद्रावर भारताची छाप उमटवण्याचा प्रयत्न प्रज्ञान (Pragyan) या रोव्हरच्या माध्यमातून करणार आहे. म्हणजेच इस्रोच्या (ISRO) च्या रोव्हरने – प्रज्ञानने चंद्रावर संचार केला तर खऱ्या अर्थाने चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाली असं म्हणता येईल.

तेव्हा आज म्हणजेच २३ ऑगस्टला होणाऱ्या चांद्रयान ३ च्या vikram lander – विक्रम लँडरच्या soft landing कडे सर्वांचे लक्ष लाहून राहिले आहे. पण हे यश मिळाल्यावर पुढचा टप्पा म्हणजचे २६ किलोग्रॅम वजनाच्या रोव्हरने lander च्या पोटातून बाहेर येत चांद्र भूमीवर संचार करणे हा असेल. यात जर यश मिळालं तर चंद्रावर रोव्हरद्वारे संचार करणारा भारत हा जगातील चौथ्या देश ठरणार आहे. तेव्हा याआधी कोणत्या देशाचे किती रोव्हर हे चंद्राच्या जमिनीवर संचार करु शकले आहेत याची माहिती थोडक्यात…

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
NIA Raids on suspicion of links with Jaish e Mohammed terror outfit Mumbai news
एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

चंद्रावरील रोव्हर

सर्वात आधी चंद्रावर रोव्हरद्वारे संचार करण्यात सोव्हित रशियाला यश मिळाले आहे. Lunokhod 1 नावाचा सुमारे ७०० किलो वजनाचा रोव्हर हा Luna 17 यानाच्या मार्फत १७ नोव्हेंबर १९७० ला चंद्रावर उतरला होता आणि उतरल्यावर काही तासांनी चांद्रभूमीवर संचार केला होता. सुमारे १० महिने या रोव्हरने चंद्रावर संचार केला.

Lunokhod 2 नावाच्या आणि सुमारे ८०० किलो वजनाच्या रोव्हरने १५ जानेवारी १९७३ पासून चंद्रावर संचार करायला सुरुवात केली होती. जुन १९७३ ला शेवटचा संपर्क होईपर्यंत त्याने चंद्रावर ४२ किलोमीटर एवढे अंतर पार केले होते. रशियाच्या हे दोन्ही रोव्हरचे नियंत्रण हे अर्थात पृथ्वीवरुन केले जात होते.

तर त्याच काळात अमेरिकेच्या समानवी चांद्र मोहिमा सुरु होत्या. तेव्हा अपोलो १५, १६ आणि १७ या मोहिमांच्या माध्यमातून चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांनी Lunar Roving Vehicle (LRV) च्या माध्यमातून चंद्रावर संचार केला होता.

चीनच्या आत्तापर्यंत दोन रोव्हरना चंद्रावर उतरवण्यात यश मिळालं आहे. १४ डिसेंबर २०१३ ला Yutu 1 नावाच्या रोव्हरने चंद्रावर संचार करायला सुरुवात केली. ऑगस्ट २०१६ पर्यंत हा रोव्हर कार्यरत होता.

तर आत्ता Yutu २ नावाचा रोव्हर हा पृथ्वीवरुन कधीही न दिसणाऱ्या मागच्या बाजूला ३ जानेवारी २०१९ पासून संचार करत आहे.

अपयशी रोव्हर मोहिमा

एकीकडे रशिया, अमेरिका आणि चीनला या देशांना यश मिळाले असतांना चंद्रावर उतरण्याच्या पहिल्या प्रयत्नात भारताला चांद्रयान २ मध्ये अपयश आले होते, ज्यामध्ये रोव्हरने संचार करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. तर United Arab Emirates देशाने रोव्हरला घेत चंद्रावर उतरण्याचा याच वर्षी म्हणजेच एप्रिल २०२३ ला प्रयत्न केला होता ज्यात अपयश आले होते. तर जपानने पण एप्रिल २०२३ मध्ये रोव्हरद्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला होता ज्यात अपयशाचा सामना करावा लागला होता.

Story img Loader