ओडिसाच्या पुरी या मंदिरात जगन्नाथ पुरी रथ यात्रेचा उत्सव १२ जुलैपासून सुरू होत आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांसह ही यात्रा होणार आहे. पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराचं खूप महत्त्व आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथे भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे २४ अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचं सांगितलं जातं. भगवान बालभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ या तीन देवतांची या सणाच्या दिवशी उपासना केली जाते. जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते.प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा संपन्न होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुजेची वेळ

१२ जुलै २०२१ सोमवारी रथयात्रा

द्वितीया तिथी प्रारंभ – ११ जुलै २०२१ सकाळी ०७.४७ वाजेपासून

द्वितीयाची तारीख समाप्त – १२ जुलै २०२१ सकाळी ०८.१९ वाजेपर्यंत

जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचं महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, जगन्नाथ रथयात्रा काढून भगवान जगन्नाथाला तिथं प्रसिद्ध असलेल्या गुंडिचा माता मंदिरात पोहोचवलं जातं. म्हणून या रथयात्रेची तयारी खूप आधीपासून सुरू केलेली असते. गुंडिचा मंदिरात भगवान जगन्नाथ आराम करतात म्हणून रथयात्रेच्या एक दिवसापूर्वी गुंडिचा (Gundicha) मंदिर चांगल्या पद्धतीनं स्वच्छ केलं जातं. या स्वच्छेतेच्या कार्याला गुंडिचा मार्जन असं म्हणतात. मंदिराच्या स्वच्छतेसाठी खास इंद्रद्युम्न तलावातून पाणी आणलं जातं. आपल्याला कदाचित हे माहिती नसेल पण भगवान जगन्नाथाची ही रथयात्रा फक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी पुरी येथे जगभरातून भाविक दाखल होतात. जगन्नाथ मंदिर देशातील चार धाम पैकी एक आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी जगन्नाथ मंदिरात जावून देवाचं दर्शन घेणं ही सर्वच हिंदूंची इच्छा असते.

यात्रेसाठी कोविड मार्गदर्शक तत्त्वे

पुरी जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना एएनआयला म्हणाले, “गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ओडिसा सरकारने सुप्रीम कोर्टाने आणि एसओपीच्या आदेशानुसार १२ जुलै, २०२१ रोजी रथ यात्रा भाविकांविना केली जाईल. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असेल  आणि संपूर्ण लसीकरण झालेल्या रथ चालकांना यात्रेत येण्याची परवानगी देण्यात येईल. पोलिस कर्मचारी वगळता सुमारे १००० अधिकारी तैनात केले जातील. ”

 

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagannath puri rath yatra 2021 date puja timings histroy and covid guidelines ttg
Show comments