World Most Expensive Fish : जगभरातील लाखो लोक रोज मासे आवडीने खातात. माश्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ आणि औषधे बनवली जातात. साधारण ५० ते ६० रुपये प्रतिकिलो ते जास्तीत जास्त ४०० ते १००० रुपयांपर्यंत मासळी बाजारात उपलब्ध असतात. पण जगातील अनेक मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्या माशांना मिळणारी किंमतही कितकी आहे. काही मासे इतके महाग आहेत, की आपण त्यांच्या किंमतीची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग माश्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल, हा मासा लाखो नाही तर करोडो रुपयांच्या घरात विकला जातो. त्यामुळे या माश्यामध्ये काय खासियत आहे जाणून घेऊ…
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागड्या माश्याचे नाव टून फिश आहे. हा मासा जपानमध्ये आढळतो. ज्याचे वजन २०० किलोपेक्षा जास्त असते. तसेच तो ४० वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतो. जानेवारी २०२३ मध्ये जपानची राजधानी टोकियोमध्ये २१२ किलो वजनाच्या टूना माश्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी या माश्यावरील बोली लाख 73 हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. म्हणजेच तो मासा (टूना फिश) सुमारे 2 कोटी 23 लाख 42 हजार रुपयांना विकला गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा मासा व्हेलप्रमाणे जगातील सर्वात मोठ्या माश्यांपैकी एक आहे. जपानी टूना मासा उत्तर ध्रुवीय समुद्र आणि प्रशांत महासागरात आढळतो. तसेच सर्वात मोठ्या आकाराचा टूना मासा केवळ प्रशांत महासागरात आढळतो. या माशाला ब्लूफिन टूना असेही म्हणतात .सहसा हा मासा खोल समुद्रात पोहत असतो आणि क्वचितच वर येतो. इतर भागात आढळणाऱ्या टूना माशाला यलोफिन टूना असे म्हणतात. ज्याचे वजन सुमारे ७० किलो असते.

टूना मासा इतका महाग का विकला जातो?

हा मासा महाग विकला जाण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. पहिले कारण म्हणजे या माश्याची चव उत्कृष्ट मानली जाते, जी प्रत्येकाला आवडण्यासारखी असते. दुसरे म्हणजे यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन बी १२, प्रोटीन, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात. तिसरे म्हणजे हा मासा अतिशय कमी प्रमाणात आढळतो. अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत असल्याने किंमतही जास्त मिळते.

हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्याच्या संवर्धनासाठी दरवर्षी २ मे रोजी ‘जागतिक टूना दिवस’ साजरा केला जातो. या माश्याचे समुद्रातील अस्तित्व टिकवून ठेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर २०१६ मध्ये अधिकृतपणे जागतिक टूना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese tuna fish is world most expensive fish read price weight and more sjr