Plastic Bottles: आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. मिनरल वॉटरच्या नावावर बाजारात या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा, या बिसलरी लाऊ…?” आणि अशा वेळी तुम्ही ही बाटली सहज खरेदी करता व स्वतःची तहान भागवता. मात्र असे करणे तुम्हाला महागात पडू शकते.
प्रत्येक बॉटल सारखीच सुरक्षित नसते…!
प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या. तेथील त्रिकोण हे दर्शवतात की, त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते. जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त तुमच्या प्लास्टिक किंवा PET बाटलीच्या तळाशी असलेले अंक आणि मार्कर समजून घ्यायचे आहेत.
लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतून पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.
आणखी वाचा : Teeth Treatment: दातांवरील उपचारानंतर ‘अशी’ घ्या काळजी; दात राहतील मोत्यासारखे चमकदार!
‘या’ बाटल्यांमधून पाणी पिणे सुरक्षित
बाटलीच्या तळाशी २, ४ किंवा ५ क्रमांक लिहिलेले असल्यास ती खरेदी करा. या बाटल्यांमध्ये पाणी भरणे सुरक्षित आहे. या क्रमांकांवरच नव्हे तर तळाशी लिहिलेले शब्द पाहून तुम्ही स्वतःसाठी प्लास्टिकची बाटली खरेदी करू शकता.
तुम्हाला कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीखाली एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलीथिलीन), एलडीपीई (कमी घनता पॉलीथिलीन) आणि पीपी (पॉलीप्रोपायलीन) असे कोड लिहिलेले दिसले तर तुम्ही तेही खरेदी करू शकता. अशा बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात.
- एचडीपीई (उच्च घनता पॉलिथिलीन)
हा कोड असलेली बाटली तयार करण्यासाठी हाय-डेन्सिटी पॉलिथिनचा वापर करण्यात आला आहे. ते सुरक्षित मानले जाऊ शकते. यामुळेच ही बाटली पुन्हा पुन्हा वापरता येते.
- LDPE (कमी घनता पॉलीथिलीन)
जर बाटलीच्या तळाशी ४ क्रमांक दिलेला असेल तर ही बाटली पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजेच तुम्ही ते पुन्हा पुन्हा वापरू शकता. ते तयार करण्यासाठी LDPE चा वापर केला जातो. सामान्य खरेदीच्या पिशव्या, केचपच्या बाटल्या, ब्रेड बॅगमध्ये याचा वापर केला जातो.
- पीपी (पॉलीप्रोपीलीन)
जर तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी ५ क्रमांक लिहिलेला दिसला तर ते सर्वात सुरक्षित म्हटले जाईल. हे तयार करण्यासाठी पीपी (पॉलीप्रॉपिलीन) वापरले जाते. हे साधारणपणे आइस्क्रीम कप बनवण्यासाठी वापरले जाते. मायक्रोवेव्ह ओव्हनची भांडी, औषधाच्या बाटल्या, दही पॅकिंगमध्येही याचा वापर होतो.
‘या’ बाटल्यांमधून पाणी पिणे घातक
- पीईटी किंवा पीईटीई (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट)
सामान्यतः सर्व प्लास्टिकच्या खनिज पाण्याच्या बाटल्यांच्या तळाशी कोडसह PETE किंवा PET लिहिलेले असते. म्हणजे बाटलीमध्ये पॉलिथिलीन टेरेफ्थालेट रसायनाचा वापर करण्यात आला आहे.
ही रसायने बाटलीचा पुनर्वापर करून शरीरात कर्करोगाच्या आजाराला जन्म देऊ शकतात. त्यामुळेच या बाटल्यांवर क्रश द बॉटल आफ्टर यूज असे लिहिलेले असते. मुदत संपल्यानंतर या बाटल्या वापरू नयेत.
- व्ही किंवा पीव्हीसी (पॉलीविनाइल क्लोराईड)
ज्या बाटलीखाली ३ क्रमांकाचा कोड लिहिला आहे. ते तयार करण्यासाठी V किंवा PVC चा वापर केला जातो. ही बाटली वापरल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे.