Kaho Naa Pyaar Hai : हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ चित्रपट २००० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली. या चित्रपटातून हृतिकने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटामुळे अभिनेता रातोरात स्टार झाला. हृतिकसह या चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेलने प्रमुख भूमिका साकारली होती.

‘कहो ना प्यार है’ ( Kaho Naa Pyaar Hai ) चित्रपट फक्त १० कोटींच्या बजेटमध्ये राकेश रोशन यांनी बनवला होता. मात्र, चित्रपटाची कथा, यातील गाणी, पदार्पण केलेले नवे कलाकार या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण केली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात ७८.९३ कोटी कमावले होते. याशिवाय ‘कहो ना प्यार है’ सिनेमाचं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये देखील नोंदवण्यात आलं आहे.

cannes winner all we Imagine as light hit theaters
‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चे देशभर प्रदर्शन; ‘कान’ महोत्सवात स्पर्धेतील विजेता चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
Shraddha Kapoor unveils the Express Group Screen magazine
दिमाखदार कार्यक्रमात ‘स्क्रीन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला
CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
Paresh Mokashi, Prashant Damle as Hitler,
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात

हेही वाचा : तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट कोणी दुसरंच वापरतंय का? वेळीच सावध व्हा अन् ‘या’ Settings चेक करा, जाणून घ्या…

हृतिक रोशनला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार जिंकणारा हृतिक रोशन एकमेव अभिनेता ठरला. याशिवाय पहिल्याच चित्रपटात अभिनेत्याने डबल रोल साकारण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानकडून खास टिप्स घेतल्या होत्या. चित्रपटादरम्यान बॉडी बनवण्यासाठी हृतिकला फार मेहनत घ्यावी लागली. काही केल्या त्याला बॉडी बनवणं शक्य होत नव्हतं, शेवटी हृतिकने कंटाळून सलमान खानला कॉल केला होता. २००२ मध्ये या चित्रपटाची ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : रेल्वेमधले डायनॅमिक तिकीट दर म्हणजे काय? प्रवाशांच्या मागणीनुसार वाढत जातात तिकिटांच्या किंमती…

‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद का झाली?

‘कहो ना प्यार है’ची ( Kaho Naa Pyaar Hai ) ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याचं मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाने एकूण १० ते २० नव्हे तर तब्बल ९२ पुरस्कार जिंकले आहेत. यामुळेच याची नोंद २००२ मध्ये ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’ करण्यात आली. याशिवाय या चित्रपटाचं नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या कोणत्याच चित्रपटाने एवढे पुरस्कार जिंकले नव्हते.

हेही वाचा : Sugar Monitoring Patch : कतरिना कैफच्या हातावरच्या पॅचची चर्चा! काय असतो शुगर मॉनिटरिंग पॅच?

Kaho Naa Pyaar Hai
‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai)

दरम्यान, ‘कहो ना प्यार है’ ( Kaho Naa Pyaar Hai ) चित्रपटात हृतिक, अमीषा यांच्यासह अभिषेक शर्मा, अनुपम खेर, व्रजेश हीरजी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.