Indian Currency Ganpati Photo: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असणार असल्याचेही केजरीवालांनी म्हंटले आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत त्यामुळे महात्मा गांधींसह बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले आहे. यावेळी केजरीवालांनी इंडोनेशिया देशाच्या नोटांचा दाखला दिला. केजरीवालांनी उल्लेख केलेल्या इंडोनेशयातील गणपतीच्या फोटोच्या नोटेचा इतिहासही अगदी रंजक आहे. चला तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीवरील श्रद्धेपोटी इंडोनेशियाने देशाच्या चलनावर गणरायाला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे इंडोनेशयातील तब्ब्ल ८७.५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मिय आहे. गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानतात, हा ६४ कलांचा अधिपती विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. याच भावनेतून इंडोनेशियाच्या चलनावर बाप्पाचे चित्र छापलेले आहे. इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्येचे देश असून येथील केवळ तीन टक्के लोकसंख्या हिंदूधार्मिय आहे.

इंडोनेशियाच्या नोटांवर झळकले गणपती

इंडोनेशियात २० हजाराच्या नोटेवर समोर गणपतीचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नायक आहेत.

गणपती बाप्पांचा फोटो असलेल्या नोटेचा इतिहास

काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना तत्कालीन सरकारने २० हजार रुपयांची नोट छापली व त्यावर गणपतीचा फोटो होता काही काळाने देशाची आर्थिक व्यव्यस्था सुधारली तेव्हा हे सर्व गणपतीच्या आशीर्वादाने शक्य झाले अशी लोकांची मान्यता होऊ लागली परिणामी गणपतीच्या प्रतिमेची नोट अजूनही वापरली जाते. इंडोनेशियात भारतीय रुपया हेच चलन असले तरी, किंमत वेगवेगळी आहे.

इंडोनेशियाचा काही भाग एकेकाळी चोल राजवटीच्या अधिपत्याखाली होता तेव्हा तेथे अनेक मंदिरे बांधण्यात आली होती. इंडोनेशियन लोकांना महाभारत आणि रामायण माहीत आहे. जकार्ता चौकात रथावर स्वार झालेला अर्जुन-कृष्ण व सोबत घटोत्कचाची सुद्धा मूर्ती आहे. इंडोनेशियात लष्कराचा मॅस्काॅट हनुमान आहे. एकूणच इंडोनेशियात भारतीय व मूळ हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवून देणारे अनेक पैलू पाहायला मिळतात पण त्यातही बाप्पाचे चित्र असणारी ही नोट अत्यंत खास आहे.

दरम्यान. “सर्व नव्या नोटा बदला असं आमचं म्हणणं नाही. पण नव्या नोटांवर हे फोटो छापत सुरुवात करु शकतो, असेही केजरीवाल म्हणाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा पडता भाव पाहता दिवाळीच्या पूजेदरम्यान देवी देवतांचे फोटो छापण्याची कल्पना सुचली असे केजरीवाल यांनी सांगितले होते. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यावरून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोही छापण्याचा सल्ला दिला आहे

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal indian currency to have ganesha lakshmi photo why indonesian currency note has ganpati history svs
First published on: 27-10-2022 at 13:19 IST