Sankrant and Kinkrant Difference : हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायणदेखील म्हटलं जातं. यंदाची संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रात का साजरी केली जाते? या सणाचे महत्त्व आणि पौराणिक कथा आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकल्या असतील; पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या किंक्रांतीचे काय महत्त्व आहे ठाऊक आहे का?

खरंतर, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु, किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन केले जाते.

Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
shantanu deshpande bharat shaving company
“…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तीळगूळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा-आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनींचे कोडकौतुक करण्याची प्रथा आहे. मात्र, शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते.

हेही वाचा: Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व

मकर संक्रांत आणि किंक्रांतमध्ये काय फरक?

मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासूराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते; त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला. या दिवशी कोणतेही शुभ कार्य असल्याचे म्हटले जाते. या दिवसाला करिदिन म्हणूनही संबोधले जाते. या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंक्रांतीला खाल्ली जाते.

Story img Loader