भारत सरकारमध्ये ज्या क्षेत्रात चांगले काम सुरु आहे. त्यातीलच एक महत्वाचा विभाग म्हणजे रस्ते वाहतूक विभाग. नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत. देशभरात सगळीकडे चांगल्या आणि मोठ्या रस्त्यांचे नेटवर्क उभारण्याचे काम भारत सरकार करत आहे. आज आपण दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याच्या पहिल्या भागाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली आणि मुंबईमधील अंतर कमी झाले आहे. हा एक हायटेक एक्सप्रेस वे असून हा सध्या युरोप-अमेरिकेतील एक्सप्रेस-वे ला स्पर्धा करताना दिसत आहे. दिल्ली मुंबईमधील अंतर कमी करण्यासोबतच हा एक्सप्रेस-वे देशातील ४५ शहरांना एकमेकांशी जोडला जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे बद्दलच्या पाच गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

हेही वाचा : MS Dhoni Classic Car Collection: कॅप्टन कूल धोनीच्या ताफ्यात आहेत ‘या’ क्लासिक कार; एक झलक बघाच

१. नवी दिल्ली -मुंबई द्रुतगती महामार्ग हा नावाप्रमाणेच देशाची राजधानी ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडतो. हा महामार्ग दिल्लीमधील डिएनडी फ्लायवे आणि महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदरापासून सुरु होतो. तसेच हा महामार्ग गुजरातमधील दौसा, कोटा, वडोदरा आणि सुरत या शहरांमधून जातो.

२. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे या मार्गाची एकूण लांबी १,३५० किमी इतकी आहे. हा एक्सप्रेस -वे दिल्ली (१२ किमी), हरियाणा (१२९किमी), राजस्थान(३७३ किमी ), मध्य प्रदेश(२४४ किमी ), गुजरात (४२९ किमी) आणि महाराष्ट्र (१७१ किमी ) या राज्यांमधून जातो. या सर्वाना DND फरिदाबाद -केएमपी (५९ किमी ) आणि विरार JNPT (९२किमी )मध्ये जोडल्यास या एक्सप्रेस-वेची एकूण लांबी १,३८६ किमी इतकी होते.

३. या एक्सप्रेस वे शिवाय दिल्ली-मुंबई दरम्यानच्या प्रवासाला २४ तासांचा कालावधी लागतो. आता हा महामार्ग पूर्ण झाल्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर १२ तासांनी कमी झाले आहे. याचाच अर्थ रस्ते वाहतुकीमुळे एका दिवसांत दोन शहरांमध्ये मालवाहतूक होऊ शकते.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग – (Image Credit – Twiiter/ Nitin Gadkari)

हेही वाचा : फक्त ३० हजार रुपयांत Tata Motors च्या ‘या’ जबरदस्त SUV च्या बुकिंगला झाली सुरुवात, जाणून घ्या फिचर्स

४. हा नवीन महामार्ग ८ लेनचा महामार्ग आहे. भविष्यात गरज वाटल्यास तो १२ लेन पर्यंत वाढवला जाऊ शकतो. झाडे लावण्यासाठीआणि सुविधांसाठी जागा असलेल्या या अतिरिक्त लेनसाठी जमीन आरक्षित केली जाणार आहे. यावर टीएम, किरकोळ दुकाने, फूड कोर्ट, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि इंधन पंप अशा स्वरूपाच्या ९३ सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा भारतातील पहिला महामार्ग असेल ज्यामध्ये प्रत्येक १०० किमी अंतरावर हेलिपॅड आणि पूर्णपणे सुसज्ज ट्रॉमा सेंटर असतील.

५. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे भूमिपूजन हे २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या हस्ते करण्ययात आले होते. हे काम १,००,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची रक्कम , एकूण ५२ बांधकाम पॅकेजसेसह ४ विभागांमध्ये विभागले गेले होते.