Know About Flats Square Feet : दिवसेंदिवस प्रॉपर्टिच्या किंमती वाढत असल्याने नोकरी करणारी लोकंही घर खरेदी करताना शंभरवेळा विचार करतात. वाढत्या महागाईमुळं 1BHK,2BHK आणि 3BHK फ्लॅट खरेदी करणं आजच्या जमान्यात सोपं राहिलं नाहीय. अनेकदा लोकं कर्ज काढून फ्लॅट खरेदी करत असतात. पण फ्लॅट खरेदी करताना विकसकाकडून बेकायदा बांधकाम किंवा वर्गफुटात अफरातफर झाल्यावर ग्राहकांची फसवणूक होते. कधी कमी जागेवर बिल्डर इमारत बांधतात. तर अनेकदा पजेशन देण्यात काही वर्षांचा कालावधी लावतात. आज आम्ही तुम्हाला 1BHK, 2BHK आणि 3BHK फ्लॅटबद्दल संपूर्ण माहिती देणार होतात. हे फ्लॅट किती क्षेत्रफळात बांधलेले असतात आणि या फ्लॅटचा मॉडेल काय असतो, याबाबत तुम्ही सविस्तर माहिती जाणून घ्या.
1BHK फ्लॅटबद्दल समजून घ्या
1BHK फ्लॅटमध्ये स्टॅंडर्ड आकारात बनवलेला एक बेडरुम, एक हॉल आणि किचन असतं. याचं क्षेत्रफळ सामान्यत: ४०० ते ५०० वर्गफुट मध्ये असतं. आताच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसाठी 1BHK फ्लॅट खरेदी करणं एका चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही या 1BHK फ्लॅटच्या हॉलला मुलांसाठी बनवण्यात आलेल्या वन बेडरुमप्रमाणे वापरु शकता. जर तुमचा बजेट थोडा जास्त असेल, तर तुम्ही 1.5BHK अपार्टमेंटही खरेदी करु शकता. यामध्ये दोन रुम असतात. एक स्टॅंडर्ड आकाराचा मास्टर बेडरुमही असतो. तर दुसरा बेडरुम स्टॅंडर्ड आकाराहून थोडा असतो.
2BHK फ्लॅट कसा असतो?
एका युनिटमध्ये दोन बेडरुम, एक हॉल आणि एक किचन म्हणजे 2BHK फ्लॅट. या फ्लॅटच्या मास्टर बेडरुममध्ये अटॅच्ड टॉयलेट आणि रुमच्याबाहेर गेस्ट वॉशरुम असतं. अशाप्रकारचे फ्लॅट खासकरून छोटी मुलं असणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबीय खरेदी करतात. या फ्लॅटमध्ये 1BHK पेक्षा जास्त जागा असते. जर 3BHK तुमच्या बजेटच्या बाहेर असेल, तर तुम्ही 2.5 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करु शकता. 2.5 BHK मध्ये 2 मास्टर बेडरुम, एक छोटा रुम, एक लिविंग रुम आणि एक किचन असतं. याचं क्षेत्रफळ सधारणत: ९५० वर्गफुटांहून अधिक असतं.
3BHK फ्लॅटबाबत संपूर्ण माहिती समजून घ्या
3BHK फ्लॅटमध्ये एका युनिटमध्ये तीन बेडरुम, एक हॉल आणि एक किचन असतं. अशाप्रकारच्या थ्री बीएचके अपार्टमेंट्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या अपार्टमेंट्सची विक्री लहान-मोठ्या शहरांमध्ये वेगानं होत आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करण्याचा कल वाढताना दिसत आहे. अशाप्रकारच्या 3BHK फ्लॅटमध्ये वॉशरुमचे तीन सेट असतात. यापैकी दोन वॉशरुम दोन्ही रुमला अटॅच्ड असतात. तर तिसरा गेस्ट वॉशरुम बाहेरच्या बाजूला असतो. या फ्लॅटची किंमत 2BHK फ्लॅटपेक्षा खूप जास्त असते.