Gold Rate : काही दिवसांपासून भारतात सोने-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी दिसून येत आहे. आज भारतात १० ग्रॅम २२ कॅरेट सोने ५५,१०० रुपयांना; तर २४ कॅरेट सोने ६०,१०० रुपयांना विकले जात आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे भारतात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.
भारतात जरी सोने महाग असले तरी इतर काही देशांमध्ये ते स्वस्त आहे. तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेत भारतापेक्षा सोने स्वस्त आहे? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.

अमेरिकेतील सोन्याचे दर

अमेरिकेत १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७६ डॉलर आहे म्हणजेच ४७,२७१ रुपये; तर भारतात मात्र तो ५५,१०० रुपये आहे. अमेरिकेत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२८ डॉलर म्हणजेच ५१,५४१ रुपये; तर भारतात त्याची किंमत ६०,१०० रुपये आहे. यावरून तुम्हाला कळेल की, अमेरिकेत भारताच्या तुलनेत सोने स्वस्त आहे.

हेही वाचा :Cockroach Farming : ऐकावं ते नवलच! या ठिकाणी केली जाते झुरुळांची शेती; आवडीने खातात लोक झुरळ!

अमेरिकन चलन एक डॉलर म्हणजे ८२.०७ रुपये म्हणजेच रुपयांच्या तुलनेत डॉलर महाग आहे. त्यामुळे सोन्याचे दर भारतापेक्षा अमेरिकेत जास्त असायला हवेत; पण प्रत्यक्षात तसे नाही. अमेरिकेत उलट सोने स्वस्त आहे. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी अमेरिका हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर अमेरिकेतील लोक भारतीयांच्या तुलनेत खूप कमी दागिने वापरतात.

Story img Loader