Procedure For Bank Locker Rules : बॅंकेत पैसै जमा करण्यासोबतच तुम्ही ज्वेलरी, प्रॉपर्टीची महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक नेहमी बॅंकेत लॉकर घेत असतात. जर तुम्हाला बॅंकेत लॉकर घ्यायचं असेल, तर आम्ही तुम्हाला याची सोपी प्रक्रिया सांगणार आहोत. याचसोबत आम्ही तुम्हाला यासोबत जोडल्या गेलेल्या नियमांबाबत माहिती देणार आहोत. ही प्रक्रिया सर्व लॉकर धारकांना फॉलो करावी लागते.
लॉकर कसं मिळवू शकता?
जर तुम्ही पहिल्यांदा लॉकर घेत असाल, तर हे लॉकर मिळण्यासाठी आवश्यक नियमांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर कोणत्या व्यक्तीचा एखाद्या बॅंकमध्ये खातं नसेल, तर तुम्हाला यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. अनेकदा ग्राहकांना लॉकर मिळवण्यासाठी ६ महिन्यांपासून ते १ वर्षांपर्यंत प्रतिक्षा करावी लागते. लॉकर मिळवण्यासाठी तुम्हाला बॅंकेतून ‘memorandum of letting’साईन करावं लागतं. यामध्ये तुम्हाला लॉकरचा वापर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांबाबत माहिती दिली जाईल. तसच याबाबतच्या नियम व अटींबद्दलही माहिती दिली जाईल.
जॉईंट लॉकर कसे मिळवाल?
बॅंकेत तुम्ही सिंगल लॉकरऐवजी जॉईंट लॉकरसाठीही अप्लाय करू शकता. यासाठी दोन्ही व्यक्तींना बॅंकेत येऊन जॉईंट मेमोरॅंडमवर (memorandum) सही करावी लागेल. जर तुम्हाला बॅंकेत लॉकर सुरु करायचं असेल, तर तुम्हाला बॅंकेत बचत खाते सुरु करण्यासाठीही सांगू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्या बॅंकेत खातं सुरु करावं लागू शकतं.
लॉकरचं भाडं किती असेल?
तुमचा लॉकर कुठे निश्चित करण्यात आला आहे, यावर लॉकरचे भाडे अवलंबून असते. तसंच लॉकरच्या साईजवरूनही भाडे ठरवले जाते. मेट्रो, अर्बन, सेमी अर्बन आणि ग्रामिण भागातील भाडे वेगवेगळे स्वरुपात असते. बॅंक ग्राहकांकडून २ ते ३ वर्षांपर्यंतचं भाडं अॅडवान्स म्हणूनही घेत असतात. साईज आणि शहरांनुसार हे भाडे १५०० ते २०,००० रुपयांपर्यंत असू शकते. भाडे देण्याबरोबरच नोंदणी शुल्क, रेंट ओवर ड्यू चार्जसह सुरुवातीच्या काळात अन्य चार्जेसही घेऊ शकतात. सरकारी बॅंकेंचे लॉकरचे भाडे खासगी बॅंकेच्या तुलनेत कमी असते.
लॉकरला ऑपरेट कसं कराल?
बॅंकेत लॉकर घेतल्यानंतर ते वापरणं खूप सोपं असतं. यासाठी तुम्ही बॅंकेत जाऊन लॉकर ऑपरेट करण्याबाबत माहिती द्या. त्यानंतर बॅंकेकडून तुमची सर्व माहिती मागवली जाईल. ही माहिती तिथे अपडेट केली जाईल. त्यानंतर आधारकार्ड, पॅनकार्डची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला एक चावी दिली जाईल. त्यानंतर बॅंकेचा क्लार्क तुमच्यासोबत लॉकर रूममध्ये जाऊन लॉकर अर्धवट उघडे करून देईल. त्यावेळी तुमच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीच्या मदतीने तुम्ही लॉकर पूर्णपणे उघडू शकता. तुमचं काम झाल्यानंतर क्लर्क पुन्हा तो लॉकर पूर्णपणे बंद करेल.