लोक सुट्टीच्या दिवसात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी फिरायला जात असतात. काही लोकांना डोंगरभाता फिरायला आवडतं. तर कुणाला महासागरात लपलेल्या सुंदर बेटांवर जायला आवडतं. काही बेटं इतकी सुंदर असतात की त्यांचं सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात खतरनाक बेटांबद्दल माहिती देणार आहोत. कारण या ठिकाणी गेल्यावर धोक्याची घंटा वाजू शकते. ही बेटे सुंदर आहेत पण तितकीच धोकादायकही आहेत. जाणून घ्या यामागची कारणे.

सबा आयलॅंड

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
pappu yadav death threat
Salman Khan gets Threat: “जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत

नेदरलॅंडमध्ये ‘सबा आयलॅंड’ वसलेलं आहे. या छोट्या बेटाचं क्षेत्रफळ फक्त १३ वर्ग किलोमीटर आहे आणि हे बेट खूप आकर्षित आहे. परंतु, या ठिकाणी खतरनाक समुद्री वादळं येतात. या वादळांमुळे अनेक जहाजांना या बेटाजवळ अपघात झाला आहे. जहात तुटून पाण्यात बुडाले आहेत. सध्याच्या घडीला या बेटावर जवळपास २ हजार लोक राहतात.

मगरींचं बेट, राम्री आयलॅंड

म्यानमार मध्ये खतरनाक ‘राम्री आयलॅंड’ आहे. या आयलॅंडला ‘मगरींचं बेट’ असंही म्हटलं जातं. या ठिकाणी अनेक खतरनाक मगरींनी भरलेली झील आहे. या बेटाचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोदंवलं गेलं आहे. कारण इथे राहणाऱ्या मगरींनी सर्वात जास्त लोकांवर हल्ला केला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जवळपास १००० हजार जपानी सैनिक या बेटावर राहत होते. परंतु, येथील भयानक मगरींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना खाऊन टाकलं. फक्त २० सैनिकच वाचले होते. उर्वरीत ९८० सैनिकांची मगरींनी शिकार केली होती. परंतु, काही शास्त्रज्ञ आणि इतिहासकार या घटनेला सत्य मानत नाहीत.

नक्की वाचा – मालकीण गोदावरी नदीत वाहून गेली! कुत्रा चपलेजवळ २२ तास वाट बघतच राहिला, पण…व्हिडीओनं लोकांना रडवलं

आयसोल ला गॅलोआ

‘आयसोल ला गॅलोआ’ हा एक खतरनाक आयलॅंड आहे. हे बेट इटलीत आहे. नेपल्सच्या खाडीत हे छोटसं बेट वसलेलं आहे आणि याची कहाणी खूप भयानक आहे. जो कोणी याला खरेदी करतं, त्याचा मृत्यू होतो किंवा त्याच्या कुटंबात एखादी वाईट घटना घडते, असं म्हटलं जातं. या बेटाला खरेदी करणाऱ्या अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता हे बेट सरकारच्या ताब्यात आहे. लोक या बेटावर फिरायला जातात पण रात्र व्हायच्या आधीच परत निघून येतात.

लुजोन आयलॅंड

फिलिपीन्सचा ‘लुजोन द्वीप’ वॉल्कॅनो आयलॅंड म्हणून प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी एक खतरनाक आणि सक्रीय ज्वालामुखी आहे. ज्याला ताल वॉल्कॅनो असंही म्हटलं जातं. या ज्वालामुखीच्या क्रेटरमध्ये एक झील आहे. ज्याला ताल झील म्हटलं जातं. जगभरातील लोक या आयलॅंडला पाहण्यासाठी येतात. पण या ठिकाणी जाणं धोकादायक आहे. कारण ज्वालामुखीचा कधी स्फोट होऊ शकतो, हे कुणालाच माहित नसतं. नुकतीच अशी घटना घडली होती. त्यामुळे आजूबाजूचं परिसर रिकामं करण्यात आलं होतं.