सध्या आधार कार्डचं (Aadhar Card) महत्त्व फार वाढलंय. अनेक ठिकाणी आधार कार्डशिवाय तुमचं काम होत नाही. अशातच तुमचं आधार कार्ड फाटलं असेल, हरवलं असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसं होऊ नये म्हणून घरच्या घरी ऑनलाइन आधार कार्ड कसं काढायचं हे समजून घेणं आवश्यक आहे. चला तर समजून घेऊयात घरच्या घरी आधार कार्ड काढण्याच्या अगदी सोप्या स्टेप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला घरच्या घरी ऑनलाइन आधार कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आधारच्या म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाची (UIDAI) अधिकृत वेबसाईट https://resident.uidai.gov.in/ वर जावं लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला डाऊनलोड आधारचा पर्याय दिसेल. या ठिकाणी क्लिक करुन तुम्हाला तेथे तुमचा 12 अंकी आधार नंबर नोंदवावा लागेल. यानंतर आधार कार्डमध्ये ज्या मोबाईल नंबरची नोंदणी झालेली आहे त्यावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी वेबसाईटवर टाकला की तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करता येईल.

ऑनलाईन आधार कार्डला सुरक्षेसाठी पासवर्ड

तुमचं आधार कार्ड डाऊनलोड झालं म्हणजे ते तुम्हाला लगेच वापरता येईल असं नाही. आधारच्या ऑनलाईन कॉपीचा दुरुपयोग होऊ नये आणि या खासगी माहितीची सुरक्षितता राहावी म्हणून यूआयडीएआयने या ऑनलाईन आधार कार्डला पासवर्ड दिला आहे. हा पासवर्ड प्रत्येकासाठी वेगळा असतो. त्यामुळे डाऊनलोड केलेल्या आधार कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्याचा पासवर्ड काय असतो हे समजून घेण्याची गरज आहे.

ऑनलाइन आधार कार्डचा पासवर्ड कसा शोधायचा?

तुम्ही डाऊनलोड केलेल्या ऑनलाईन आधारकार्डला 8 अंकी पासवर्ड असतो. हा पासवर्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या नावातील पहिली 4 इंग्रजी मुळाक्षरं आणि तुमच्या जन्म तारखेतील वर्षाचे 4 अंक आहेत. म्हणजेच नरेंद्रने (Narendra) त्याचं आधार कार्ड डाऊनलोड केलं आणि त्याची जन्मदिनांक 17/09/1991 असेल तर त्याला आपलं ऑनलाइन आधार कार्ड ओपन करण्यासाठी NARE1991 असा पासवर्ड टाकावा लागेल.

मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी लिंक नसेल तर काय करायचं?

महत्वाचं म्हणजे घरच्या घरी ऑनलाइन आधार कार्ड काढण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आधारला संलग्न असणं आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेलआयडी आधारशी संलग्न केलेला नसेल तर अशा स्थितीत तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊनच ओळखपत्र मिळवता येईल.