How to Read Deleted WhatsApp Messages on Android and iOS : व्हॉट्सअ‍ॅप आपल्यापैकी बरेच जण वापरतात. हा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना एका ठराविक वेळेपर्यंत आपण पाठवलेले मेसेज डिलिट करता येतात. तसेच हे मेसेज दुरुस्त करण्याचा पर्याय देखील मिळतो. पण तुम्हाला आयओएस किंवा अँड्रॉइड फोनवरून पाठवून डिलिट केलेले मेसेज देखील पाहाता येतात हे तुम्हाला माहिती आहे का? नेमकं हे कसं करता येतं याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

नोटिफीकेशन हिस्ट्री

अँड्रॉइड डिव्हाइस जे ११ आणि वरचे व्हर्जन वापरतात त्यामध्ये नोटीफिकेशन हिस्ट्री फीचर दिले जाते. हे टूल तुम्हाला आलेल्या नोटीफिकेशनची माहिती साठवून ठेवते, ज्याचा थेट वापर करून तु्म्ही डिलिट केलेले मेसेज वाचू शकता.

How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

नोटिफिकेशन हिस्ट्री सुरू कसं करणार?

१) पहिल्यांदा तुमच्या अँड्रॉइड सेंटिंगमध्ये जा.
२) त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये जा आणि अडव्हान्स सेटिंग्स उघडा.
३) त्यानंतर नोटिफिकेशन हिस्ट्रीवर क्लीक करा आणि ते सुरू करा.
४) हा ऑप्शन सुरू केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्हाला आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजची ते डिलिट केले तरी नोंद ठेवली जाईल.
५) ते पाहणासाठी सेटिंग्जवर परत जा> नोटिफिकेशन्स> नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन स्क्रोल करून तुम्ही रेकॉर्ड झालेले मेसेज पाहू शकता.

हे फीचर तुमच्या मोफत तुमच्या डिव्हाइसमध्ये देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही थर्ज पार्टी अ‍ॅपची आवश्यकता नाही. यामध्ये फक्त नोटिफिकेशन मिळालेले मेसेज दिसतील , म्हणजे म्यूट केलेल्या चॅट दिसणार नाहीत.

चॅट बॅकअपमधून

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट बॅकअप फीचर देखील देण्यात आलेले आहे. यामुळे तुम्ही डिलिट केलेली चॅट बॅकअप झालेले असेल तर पुन्हा पाहू शकता. बॅकअप मॅन्युअली किंवा आपोआप घेतले जाऊ शकते.

१) व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप वर जा.
२)तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे बॅकअप दररोज घेतले जात असल्याची खात्री करून घ्या.
३) तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा, व्हॉट्सअ‍ॅप शोधा आणि ते अनइंस्टॉल करा.
४) गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
५) व्हॉट्सअ‍ॅप उघडा, तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करा आणि बॅकअपमधून चॅट्स रिस्टोर करण्यासाठी रिस्टोर करा वर क्लीक करा.

तुम्ही अखेरचे बॅकअप घेतले त्यामध्ये डिलिट केलेले मेसेज नसतील तर ही पद्धत उपयोगी येणार नाही. बॅकअप घेतल्यानंतरचे मेसेज किंवा बॅकअप घेण्याआधी डिलेट झालेले मेसेज यामध्ये दिसणार नाहीत.

थर्ड पार्टी अ‍ॅप वापरून

Notisave सारखे थर्ड पार्टी ॲप्स नोटिफिकेशन सेव्ह करण्यासाठी डिझाइन केले आहेत आणि डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे ॲप्स डिलिट झालेले नोटिफिकेशन साठवून ठेवतात.

१) गुगल प्ले स्टोअरवरून थर्ड पार्टी ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करा .
२) ॲप लाँच करा आणि त्याला नोटिफिकेशना आणि स्टोरेजमध्ये एक्सेस करण्याची परवानगी द्या.
३) जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट केलेले मेसेज पाहायचे असतील तेव्हा Notisave उघडा.

हे ॲप्स वापरण्यास सोपे आहेत परंतु यामुळे तुमचा डेटा चोरी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा ॲप्सच्या प्रायव्हसी पॉलिसी व्यवस्थित वाचून घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच असे अ‍ॅप चांगल्या अ‍ॅप स्टोअरमधूनच डाऊनलोड करावेत.

iOS वर डिलीट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे पहावे?

आयफोन वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप iCloud बॅकअप इंटिग्रेशन दिले जातो, यामुळे डिलिट केलेले मेसेज वाचणे शक्य होते.

१) व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप वर जा.
२) त्यात डिलिट केलेले मेसेज पाहण्याआधी तुम्ही अखेरते बॅकअप कधी केले होते हे तपासून घ्या.
३)व्हॉट्स ॲप आयकॉन दाबा आणि धरून ठेवा, त्यानंतर ॲप डिलीट वर टॅप करा.
४) ॲप स्टोअरवरून व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड करा.
५) व्हॉट्सअ‍ॅप उघडा, तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करा आणि iCloud वरून चॅट रिस्टोर करा.
बॅकअपमध्ये असल्यास डिलिट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे. पण iCloud वरून रिस्टोर केल्याने सध्याच्या चॅट्स एवजी बॅकअप डेटा दिसू लागतो.

iTunes बॅकअपमधून डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कसे वाचायचे?

तुम्ही iTunes वापरून तुमच्या iPhone चा नियमित बॅकअप घेत असल्यास, तुम्ही डिलिट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज रिस्टोअर करू शकता.

१) तुमचा आयफोन मॅक किंवा पीसीशी कनेक्ट करा.
२) मॅकओएस Catalina वर iTunes किंवा Finder उघडा
३) साइडबारमधून तुमचे डिव्हाइस निवडा.
४) बॅकअप रिस्टोर करा वर क्लिक करा आणि डिलिट केलेले मेसेज असलेली बॅकअप फाइल निवडा.
५) प्रोसेस पूर्ण होण्याची वाट पाहा.
ही पद्धत प्रभावी आहे पण यामध्ये सर्व ॲप डेटा रिस्टोर केला जातो, म्हणजे बॅकअप घेतल्यानंतर तुमचा नवीन डेटा मात्र कायमचा जाईल.

Story img Loader