Indian Railway Facts : भारतील रेल्वे कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. इंडियन रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशाच्या कानाकोपऱ्या रेल्वेचं जाळं पसरलं आहे. पण याशिवाय एक राज्य असा आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन बनवण्यात आलं आहे. ज्या देशात ८ हजारांहून जास्त रेल्वे स्टेशन आहेत, पण भारताच्या या राज्यातील आकडा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिझोराम एक असं राज्य आहे, जिथे संपूर्ण राज्यात फक्त एक रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव बईरबी रेल्वे स्टेशन आहे. मिझोरामची लोकसंख्या जवळपास ११ लाख आहे पण या ठिकाणी फक्त एकच रेल्वे स्टेशन बनवण्यात आलं आहे. लोकांना प्रवास करण्यासाठी याच रेल्वे स्टेशनवर अवलंबून राहावं लागतं. या रेल्वे स्टेशनमध्ये बीएचआरबी (BHRB) आहे. हे या राज्यातील कोलासिब जिल्ह्यात आहे. या स्टेशनवरून प्रवाशांना येजा करण्यासाठी तसंच मालवाहतुकीसाठीही काम पाहिलं जातं.

नक्की वाचा – वाघाने धरला नेम पण बदकाने केला गेम! व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला ‘हा’ महत्वाचा संदेश

हा रेल्वे स्टेशन पूर्वी खूप छोटा होता. परंतु, २०१६ मध्ये याला आणखी विकसित करण्यात आलं. त्यामुळे हा स्टेशन आकर्षक बनला. या रेल्वे स्टेशनवर तीन प्लॅटफॉर्म आहेत आणि प्रवासासाठी चार ट्रॅक बनवण्यात आले आहेत. राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन असल्याने लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून या राज्यातील लोक आणखी एक रेल्वे स्टेशन बनवण्याची मागणी करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेकडून या राज्यात आणखी एक रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. तसंच याचसोबत रेल्वेचं नेटवर्क अजून चांगलं करण्याचा प्लॅन आहे. आता या राज्यात दुसरं रेल्वे स्टेशन कधी बनवणार आणि लोकांचं स्वप्न पूर्ण होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण काही वर्षांपासून दुसऱ्या रेल्वे स्टेशनच्या प्रतिक्षेत येथील नागरिक आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the indian railway facts why only one railway station in mizoram state nss