Calculator Buttons Meaning : कॅल्क्यूलेटरचा वापर सर्वांनीच कधी ना कधी केलाच असेल. आता मोबाईलमध्येही कॅल्क्यूलेटरची सुविधा उपलब्ध असल्याने मूळ कॅल्क्यूलेटरचा वापर कमी नक्कीच झाला असेल, पण बटणवाले कॅल्क्यूटेर अजूनही अनेक ठिकाणी वापरले जातात. कॅल्क्यूलेटरचा वापर सामन्यत: सर्वात जास्त बेरीज (+), वजाबाकी (-), गुणाकार (x) आणि भागाकार (÷) करण्यासाठी केला जातो. टक्केवारी काढण्यासाठीही काही प्रमाणात कॅल्क्यूलेटरचा वापर केला जातो. पण खूप लोकं असतात, जी याव्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी कॅल्क्यूलेटरचा वापर करतात. कॅल्क्यूलेटरमध्ये अनेक प्रकारचे बटण असतात. मात्र, याचा वापर बहुतांश लोक करत नाहीत.

कॅल्क्यूलेटरचा वापर करताना तुमची नजर m+,m-,mr आणि mc बटणावर नक्कीच पडत असेल. पण तुम्ही कधी या बटणाचा वापर केला आहे? या बटणांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? तुम्ही या बटणांचा अर्थ कॅल्क्यूटेरचा वापर करणाऱ्या लोकांना जरी विचारला, तरी ते या बटणांचा खरा अर्थ सांगतीलच, याची शाश्वती देता येणार नाही. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत, या बटणांचा कॅल्क्यूलेटरमध्ये कशाप्रकारे वापर केला जातो.

Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Who does fact-checking
फॅक्ट चेकिंग नेमकं कोण करतं? फॅक्ट चेकर्स कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर….
Sun ukhana sasu sun ukhana Funny video viral on social media
“दातात दात बत्तीस दात…”, सुनेचा सासूसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
UPSC Preparation Important Changes In UPSC Notification 2025
यूपीएसीची तयारी: महत्त्वाचे बदल: यूपीएससी नोटिफिकेशन २०२५
Ladki Bahin Yojana , Anil Deshmukh,
तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केल्यास… अनिल देशमुखांचा इशारा

नक्की वाचा – Bamboo Toothbrush: दात घासण्यासाठी कोणता टूथब्रश चांगला? प्लास्टिकचा की बांबूचा…? जाणून घ्या दोघांमधील फरक

या बटणांचा अर्थ काय आहे? सर्वात आधी जाणून घेऊयात : MC = Memory Clear, M+ = Memory Plus, M- = Memory Minus आणि MR = Memory Recall

M+

कॅल्क्यूलेशनला मेमरीमध्ये जोडणं म्हणजेच प्लस करणं होय. दोन वेगवेगळ्या अंकांचा गुणाकार करून त्यांच्या गुणाकाराचं उत्तर काढण्यासाठी M+ बटणाचा वापर केला जातो. खाली दिलेलं उदाहरण पाहा.

उदाहरण :

  • आपल्याकडे ५ रुपयांचे दोन नोट आहेत आणि १० रुपयांचे ५ नोट आहेत. आता आपल्याला या सर्वांना एकत्र जोडायचं आहे.
  • आपण सर्वात पहिले ५ आणि २ चा गुणाकार करणार आणि त्यानंतर m+ दाबणार. m+ दाबल्यानंतर यांचा गुणाकार सेव्ह होईल.
  • आता आपण १० आणि ५ चा गुणाकार करणार आणि m+ दाबणार. आता आपले दोन्ही कॅल्क्यूलेशन सेव्ह झाले आहेत.आता mr बटणाचा आपल्याला फायदा होणार. mr म्हणजे मेमरी रिकॉल, याचा वापर उत्तरांना जाणून घेण्यासाठी केला जातो.
  • mr बटन दाबल्यानंतर दोन्ही कॅल्क्यूलेशनचं सर्व उत्तर समोर येईल.

नक्की वाचा – Dustbin Colour Code : रग्णालयात वेगवेगळ्या रंगांचे डस्टबीन का ठेवले जातात? यामागे आहे महत्वाचं कारण, जाणून घ्या सविस्तर माहिती

m-

या बटणाचा वापर कॅल्क्यूलेशनला मेमरीमध्ये कमी करणं म्हणजेच वजाबाकी करणं होय. हे बटण दोन वेगवेगळ्या अंकांचे गुणाकार करून त्यांना कमी करण्यासाठी पावरले जातात.

उदाहरण :

  • आपल्याला दोन कॅल्क्यूलेशन करायचे आहेत.
  • आपल्याकडे १० रुपयांचे ५ नोट आहेत आणि ५ रुपयांचे २ नोट आहेत. आता आपल्याला या दोन्हींच्या गुणाकाराला कमी करायचं आहे.
  • सर्वात आधी आपण १० आणि ५ चा गुणाकार करणार आणि m- दाबणार.
  • यानंतर आपण ५ आणि २ चा गुणाकार करणार आणि उत्तर शोधण्यासाठी mr दाबणार. त्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल.

mc

  • तुम्ही आधी जे काही कॅल्क्यूलेट केलं आहे, ते सर्व हे बटण दाबल्यानंतर क्लियर होतं.
  • कॅल्क्यूलेटरमध्ये AC बटणही असतो. ऑल क्लियर असा याचा अर्थ असतो. याला दाबल्यानंतर तुम्ही जे लिहिलं आहे, ते सर्व जाणार.

Story img Loader