Car Safety Features: रस्त्यावर चालणारी वाहने सध्या मानवाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग झाले आहे. आपल्या रोजच्या कामांसाठी लोक वाहनांचा वापर करतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या मागील काचेवर काही लाल रेषा तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. तुम्हाला या रेषा सर्व कारमध्ये दिसणार नाही. त्या मॉडेलच्या टॉप व्हेरिएंट किंवा मिड व्हेरिएंट असलेल्या काही कारमध्ये या लाल रेषा दिसतील. हे पाहून तुम्हाला कधी ना कधी प्रश्न पडला असेलच की, या लाल रेषा कारच्या मागच्या काचेवर का असतात? या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला कारच्या मागच्या काचेवर या लाल रंगाच्या रेषा का दिल्या जातात, याबद्दल माहिती देणार आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडीच्या मागील काचेवर लाल रंगाच्या रेषा का असतात?

कार सुरक्षितपणे चालवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. नाही तर अपघाताला आमंत्रण मिळू शकते. गाडीच्या मागच्या काचेवरील या लाल रेषा अतिशय कामाच्या आहेत. खरंतर या रेषा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. या रेषा धातूच्या बनलेल्या असतात. त्या डिझाइनचा भाग नसून विशिष्ट कारणासाठी मागील काचेवर बसवल्या जातात. त्या नेमकं कशासाठी असतात, समजून घ्या…

(हे ही वाचा : टॉयलेट फ्लशला एक मोठे अन् एक लहान बटण का असते? वापर करण्याआधी समजून घ्या ‘हा’ फरक! )

वास्तविक, हिवाळा आणि पावसाळ्यात, धुके अनेकदा कारच्या विंडशील्डवर जमा होते, ज्यामुळे मागील दृश्यमानता कमी होते आणि अपघाताची शक्यता वाढते. हे स्पष्ट करण्यासाठी मागील काचेवर लाल रेषा दिली आहे. ज्यांना ‘डीफॉगर (Defogger) ग्रिड लाइन’ किंवा ‘डीफ्रॉस्टर ग्रिड लाइन’ म्हणतात. या रेषांमध्ये धातू असतो, कारमधील डिफॉगर स्विच ऑन करताच, मेटल लाइन गरम होते. ते तापल्यानंतर त्याच्या आजूबाजूचं काचेवरील धूकं हे नाहीसं होतं.

कारमधील हे वैशिष्ट्य हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप महत्त्वाचे आहे, कारण ते मागील आरशावर अडकलेले धुके काढून टाकण्यास मदत करते. यामुळे मागील काचेतूनही पाठीमागील दृश्य वाहनचालकाला स्पष्ट दिसू लागतं. यासाठी या कारच्या मागील काचेवर लाल रेषा असतात. गाडीच्या मागच्या काचेवर असणाऱ्या या रेषा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत, यासाठी मदत करतात. कारच्या काचा साफ करताना मागच्या काचेवर आतून या लाईन्स जाणवतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the reason for the red lines given on the rear glass of the car pdb