When and Where was the World’s First Metro Started: मुंबई व पुण्यात सध्या नव्या मेट्रो लाईनची चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे मुंबईत मेट्रो ३ चं काम पूर्ण झालं असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा सुरू केली जाणार असून दुसरीकडे पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रोची नवी मार्गिका पुणेकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पण हे झालं पुण्या-मुंबईचं. देशाचा विचार करता आपल्यासमोर मेट्रोचं आदर्श जाळं म्हणून दिल्ली मेट्रोचंच उदाहरण उभं राहातं. मात्र जगात पहिली मेट्रो कुठे आणि कधी सुरू झाली माहितीये? बरं या मेट्रोला काय म्हटलं जायचं हे समजल्यावर तुम्हाला कदाचित मोठं आश्चर्य वाटेल!

पहिली मेट्रो: नाव आणि जन्मठिकाण!

अवघ्या जगाला मेट्रोचा परिचय करून दिला तो लंडन शहरानं. ‘लंडन अंडरग्राऊंड’ (London Underground) या नावानं सुरुवात झालेल्या जगातल्या पहिल्या मेट्रोला ‘ट्यूब’ (Tube) असंही म्हटलं जायचं. नावाप्रमाणेच या मेट्रोची व्यवस्था होती. अर्थात, ही मेट्रो भूमिगत होती. त्यामुळेच तिला ‘लंडन अंडरग्राऊंड’ म्हटलं जायचं.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

पहिली मेट्रो: जन्मवेळ आणि ‘पहिलं पाऊल’!

दिल्ली मेट्रोनं जवळपास साडेतीनशे किलोमीटर पसरलेल्या आपल्या अजस्र जाळ्यातून मेट्रोचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे कसं करता येईल, याचा आदर्श नमुनाच भारतातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. पण ‘लंडन अंडरग्राऊंड’ म्हणजे समोर कोणताही असा आदर्श नसताना पहिलं-वहिलं पाऊल, अर्थात पहिल्या-वहिल्या मार्गिकेवरून धावणार होती. त्यामुळे त्याआधीचं तिचं संगोपन आणि भरण-पोषणही तसंच करण्यात आलं होतं. असंख्य प्रकारची तयारी आणि हजारो तासांच्या मेहनतीनंतर १० जानेवारी १८६३ रोजी एका मेट्रो शहरातल्या अंतर्गत वाहतुकीसाठी बनवलेली पहिली भूमिगत मेट्रो धावली.

या मेट्रोचा पहिला मार्ग लंडनमधील पॅडिंग्टन (बिशप्स रोड) ते फेरिंग्टन रोड यादरम्यानचा साधारणपणे ६ किलोमीटरचा भूमिगत मार्ग होता. या मार्गावर ७ स्थानकं होती असं सांगितलं जातं.

पहिली मेट्रो: प्रसवकळा आणि बाळंतपण!

खरंतर जगात पहिली रेल्वे याआधी ४० वर्षं म्हणजे १८२५ च्या आसपास धावली. पण एका मेट्रो शहरातल्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून शोध लागलेल्या ‘मेट्रो’ रेल्वेचं अस्तित्व १८६३ सालचंच. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत लंडन हे प्रचंड वर्दळीचं शहर झालं होतं. वाढती लोकसंख्या आणि पर्ययाने येणारी वाहतुक कोंडीची समस्या तेव्हाही जाणवत होतीच! त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक प्रभावी करण्यासाठी भूमिगत मेट्रो लाईनचा पर्याय निवडण्यात आला. चार्ल्स पिअरसन नावाच्या व्यक्तीने भूमिगत मेट्रो लाईनचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडल्याचं सांगितलं जातं.

आत्तासारखी अजस्त्र यंत्रं तेव्हा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे भूमिगत मार्गिका टाकण्यासाठी थेट मोठमोठाले खड्डे खणून त्यात मेट्रो मार्गिका टाकणे आणि नंतर वरून पुन्हा आच्छादन करणारं बांधकाम करणे अशा ‘कट अँड कव्हर’ पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यामुळे या भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी फारच कमी संधी होती. त्यात ही मेट्रो वाफेच्या इंजिनावर चालत असल्यामुळे त्याचाही धूर या भुयारांमध्ये भरून उरायचा. पण भूमिगत वाहतुकीमुळे होणारा फायदा आणि वाचणारा वेळ इतका महत्त्वाचा होता की लोकांनी या तोट्यांकडे जवळपास दुर्लक्षच केलं!

पहिली मेट्रो: ठेवण, रंग-रूप, कपडे..अर्थात रचना!

वर सांगितल्याप्रमाणे ही मेट्रो वाफेच्या इंजिनावर चालायची. प्रवाशांना बसण्यासाठी खुल्या स्वरुपातले मोठाले लाकडी कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. हे कंपार्टमेंट एकमेकांना एका रांगेत जोडून त्यातून भुयारी मार्गाने प्रवाशांची ने-आण केली जात असे.

Mumbai Metro: मेट्रो ३ नंतर नवी मेट्रो मार्गिका २०२६ मध्ये; २ ब, ४ आणि ९ च्या पहिल्या टप्प्यातील कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार

पहिली मेट्रो: बघता-बघता मोठी झाली!

‘लंडन अंडरग्राऊंड’ला नागरिकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शहरातील इतर मार्गिकाही वेगाने बांधण्यात आल्या. त्यात डिस्ट्रिक्ट लाईन, सर्कल लाईन अशा नावाच्या मार्गिकांचा समावेश होता. मेट्रोला मिळणारा प्रतिसाद इतका प्रचंड होता, की २०व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत शहरातल्या इतर अनेक भागांमध्ये मेट्रोची रुपं दिसू लागली होती.

पहिली मेट्रो: नव्या पिढीच्या हाती वारसा!

सुरुवातीला वाफेच्या इंजिनावर भरंवसा असणाऱ्या मेट्रोनं १८९० साली पुढच्या पिढीकडे सूत्रं सोपवली. शहरातल्या सिटी आणि साऊथ लंडन रेल्वे, ज्या आता नॉर्दर्न लाईनचा भाग झाल्या आहेत, त्या मार्गांवर पहिल्यांदा इलेक्ट्रिक मेट्रो ट्रेनचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व वेगवान होऊ लागला. पुढच्या दोन दशकांत बहुतांश मार्गिकांवर इलेक्ट्रिक मेट्रो धावू लागल्या.

भारतातील पहिली मेट्रो!

लंडनप्रमाणेच भारतात कोलकाता शहरामध्ये (तेव्हाचं कलकत्ता) मेट्रोचा जन्म झाला. ‘लंडन अंडरग्राऊंड’च्या तुलनेत भारतात मेट्रो अगदी अलिकडच्या काळात म्हणजे २४ ऑक्टोबर १९८४ रोजी सुरू झाली. एस्प्लानेड ते भोवानीपूर (आत्ताचे नेताजी भवन) यादरम्यानच्या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावर या शहरासाठीची पहिली मेट्रो धावली. आज जरी कोलकाता मेट्रोच्या फक्त दोनच मार्गिका असल्या, तरी देशाच्या इतर भागात पुढच्या ३० वर्षांमध्ये वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं अजस्र जाळं निर्माण होण्याची कोलकाता मेट्रो ही खऱ्या अर्थाने नांदी होती. पुढच्या काळात दिल्ली मेट्रो, बेंगलुरू मेट्रो आणि मुंबई मेट्रोच्या विस्ताराचा पाया कोलकाता मेट्रोनं घालून दिला होता.