कंडोमच्या वापराबाबत जगभरात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात कंडोमचा प्रचार करण्यासाठी सरकार संघटनांसोबत काम करत आहे. या प्रयत्नांचा चांगला परिणामही अनेक देशांमध्ये दिसून आला आहे आणि कंडोमच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात कंडोमचा सर्वाधिक वापर केला जात आहे आणि कंडोम वापरात कोणत्या देशाचे नाव सर्वात वर आहे? यासोबतच कंडोमच्या वापरात भारताची स्थिती काय आहे हेही जाणून घ्या..
कंडोमचा जास्त वापर कुठे केला जातो?
तसं, कोणता देश सर्वात जास्त कंडोम वापरतो हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. तथापि, स्टेटिस्टाच्या सर्वेक्षणानुसार, २०२१ मध्ये ब्राझील कंडोम वापरण्यात आघाडीवर आहे, ज्यासाठी असे म्हटले आहे की तेथील ६५ टक्के लोक कंडोम वापरत आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या नावांचा समावेश आहे.
सर्वाधिक कंडोम कुठे विकले जातात?
दुसरीकडे, विक्रीच्या आधारे पाहिल्यास, चीनमध्ये सर्वाधिक कंडोम विकले जातात. जास्त लोकसंख्येमुळे चीनमध्ये कंडोमची जगात सर्वाधिक विक्री होते. युरोमॉनिटरच्या मते, २०२० मध्ये चीनमध्ये सुमारे २.३ अब्ज युनिट कंडोम विकले गेले. याशिवाय, यूएसए कंडोमसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि दरवर्षी सुमारे ४०० दशलक्ष युनिट्सची विक्री होते. त्याच वेळी, जपानमध्ये देखील २०२० मध्ये कंडोमची विक्री ४२५ दशलक्ष युनिट्सवर पोहोचली आहे.
( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
भारताची स्थिती काय आहे?
भारतात कंडोम वापरणाऱ्यांची टक्केवारी कमी असली तरी लोकसंख्येमुळे भारतात कंडोमची बाजारपेठही खूप मोठी आहे. AC Nielsen च्या मते, २०२० मध्ये भारतातील कंडोमची बाजारपेठ अंदाजे १८० दशलक्ष डॉलर इतकी होती. अशा परिस्थितीत भारतातही कंडोमची विक्री वाढली आहे, असे म्हणता येईल.