अनेकजण टिफिनमध्ये जेवण पॅक करताना चपाती पॅक करण्यासाठी फॉइल पेपर वापरतात. फॉइल पेपर वापरण्याचे अनेक फायदे, तोटे सांगितले जातात. पण फॉइल पेपरचा योग्य वापर कसा करायला हवा हे फार कमी लोकांना माहीत असते, त्यामुळे अनेकजण चुकीच्या पद्धतीने फॉइल पेपर वापरतात, असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. फॉइल पेपरला दोन बाजू असतात आणि या दोन्ही बाजू अनेकांना सारख्याच वाटतात. यामुळे अन्न पॅक करताना सरळ आणि उलट बाजू लक्षात न घेताच फॉइल पेपर वापरला जातो.
पण आज आपण फॉइल पेपरची सरळ आणि उलटी बाजू कोणती?आणि त्यात अन्न कसे पॅक करायचे? यासंबंधीत काही खास गोष्टी जाणून घेऊ…
फॉइल पेपरची सरळ बाजू कोणती असते?
अहवालानुसार, भारतातील प्रत्येक तिसऱ्या कुटुंबात दररोज अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर केला जातो. पण फॉइल पेपरची सरळ किंवा उलटी बाजू कोणती याची अनेकांना माहिती नसते. फॉइल पेपर पाहिल्यास तुम्हाला एक बाजू चमकदार आणि सायनी साइड असते. तर दुसरी बाजू थोडीशी डल किंवा सिंपल प्लॅटफॉर्म सारखी दिसते. बरेच लोक चपाती पॅक करण्यासाठी चमदार साइडचा वापर करतात तर काहीजण डल साइडने चपाती पॅक करतात.
बर्याच संशोधनातून असे दिसून आले आहे की, फॉइल पेपरची चमकदार साइड जास्त उष्णता परावर्तित करते तर डल साइड उष्णतेचा उत्तम वाहक असते. यामुळे जेवण गरम राहण्यास मदत होते.
टीओआयच्या अहवालानुसार, काही तज्ञांचे म्हणणे आहे की, फॉइल पेपरच्या दोन्ही साइड ह्या कंपनीने डिझाइन केलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. फॉइल पेपर बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रियेमुळे त्याच्या दोन्ही बाजू थोड्या भिन्न आहेत पण त्याचा कोणताही वेगळा परिणाम होत नाही. यामुळे तुम्ही जेवण पॅक करण्यासाठी दोन्ही बाजूंनी फॉइल पेपर वापरु शकता. पण अनेक अहवालांमध्ये फॉइल पेपर वापरण्याचे अनेक तोटे सांगण्यात आले आहेत.
फॉइल पेपर वापरण्याचे तोटे काय आहेत?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसमध्ये टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणून काम करणारे जीन हॅरी म्हणतात की, अॅल्युमिनियममध्ये अनेक न्यूरोटॉक्सिक घटक आढळतात. फॉइल पेपरमध्ये कोणतीही एसिटिक वस्तू ठेवल्यास ती तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. यासोबतच जेव्हा तुम्ही फॉइल पेपरमध्ये गरम चपाच्या गुंडाळता तेव्हा त्याच्या उष्णतेमुळे अॅल्युमिनियम वितळू लागते.