Car tips: सुट्टीला अनेक जण ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र, अनेकदा फिरण्यासाठी गाडी बाहेर काढली की समस्या जाणवू लागतात. गाडी चालवताना कारचे इंजिन तापल्याने गाडी बंद पडण्याची शक्यता असते. कधी कधी अपघातही होऊ शकतो. भर रस्त्यात गाडीला आग लागण्याचे अनेक घटना आपण वाचल्या किंवा प्रत्यक्ष पाहिल्या असतील. गाडीची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषत: लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्ती करून घ्या. आज आम्‍ही तुम्‍हालाआज आम्‍ही तुम्‍हाला रेडिएटर फ्लशबद्दल सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्‍ही तुमच्‍या कारला लांबच्‍या प्रवासादरम्यान मेंटेन करू शकता.

रेडिएटर फ्लश म्हणजे काय?

passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

रेडिएटर कारचा एक भाग असतो जो इंजिनच्या डब्यात स्थापित केला जातो. हे सतत इंजिन कूलिंग प्रदान करते. रेडिएटर फ्लशला कूलंट फ्लश असेही म्हणतात. कूलंट कारचे इंजिन थंड ठेवून अधिक कार्यक्षम बनवते. वास्तविक हे रसायनांचे मिश्रण आहे जे कार रेडिएटर स्वच्छ करते. हे स्केलिंग आणि गंज काढण्यासाठी देखील वापरले जाते.

(आणखी वाचा : Driving License: मस्तच! आता ड्रायव्हिंग टेस्टशिवाय फक्त ७ दिवसात मिळेल लायसन्स; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया )

रेडिएटर फ्लशची आवश्यकता काय?

१. कार इंजिन अधिक तापणं हे पहिले लक्षण म्हणजे रेडिएटर फ्लश. जर कूलंट पातळी शाबूत असूनही कार जास्त गरम होत असेल, तर कार दूषित कूलंटवर चालत आहे.

२. जर कूलंट लीक होत असेल तर तुम्हाला रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे. कोणतीही गळती रेडिएटरमधील घाणीचे लक्षण आहे. कूलंटचा रंग बदलल्यास रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे.

३. इंजिनमधून आवाज येत असेल तर तुम्हाला रेडिएटर फ्लश करणं आवश्यक आहे. कूलंट काम करत नसल्याने इंजिनचं तापमान वाढतं आणि त्यातून आवाज येऊ लागतो.

४. इंजिनाभोवती दुर्गंधी येणे देखील चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ इंजिनच्या आत कूलंट गळत आहे.

रेडिएटर फ्लश किती फायदेशीर आहे?

१. रेडिएटर फ्लश न केल्यास वॉटर पंप निकामी होण्याची शक्यता आहे. जेव्हा कूलंट दूषित होते, तेव्हा त्याचे अवशेष पंप सीलवर जमा होतात आणि सीलिंगच्या पृष्ठभाग कोरडा होऊ लागतो. वॉटर पंप बियरिंग्जचे आयुष्य वाढवण्यासाठी कूलिंग सिस्टमचे फ्लशिंग आवश्यक आहे.

२. रेडिएटर फ्लश स्टेलिंग आणि गंज तसेच जुने अँटी-फ्रीझ अवशेष काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही वेळोवेळी नियमित फ्लशिंग करत असाल तर कारची कूलिंग सिस्टीम चांगली राहते आणि इंजिन व्यवस्थित थंड ठेवते.

३. रेडिएटर फ्लश दूषित कूलंटमध्ये तयार होणारा फोम देखील काढून टाकतो. जर दूषित कूलंटमध्ये फेस तयार होऊ लागला, तर नवीन कूलंट जोडल्यानंतरही फोम तयार होण्याची शक्यता असते. या प्रकरणात रेडिएटर फ्लश फायदेशीर आहे.