सकाळी लवकर उठण्यासाठी अनेकजण रात्री अलार्म सेट करून ठेवतात. पण कितीही अलार्म लावून त्या वेळेत उठणारे फार कमी जण असतात. उठवल्यानंतर काहीजण अजून ५ ते १० मिनिटं लाळून काढतात किंवा अंथरुणातचं मोबाईलवर वेळ घालवतात. यात तासभर कसा निघून जातो समजत देखील नाही. यानंतर सुरु होते कामावर वेळेत पोहचण्याची घाई.. पण तुम्ही कल्पना करा की, तुमच्या आयुष्यातील रोजचे दोन तास कमी झाले तर? किंवा घडाळ्यातील एक अंकच गायब झाला तर? होय, जगात असं एक शहर आहे. जिथे घडाळ्यात दिवसाच्या २४ तासांपैकी दोन तास रोज कमी वाजतात. अनेक महान विद्वान, उद्योजक, वैज्ञानिक आणि लेखकांनी वेळेचे वर्णन केले आहे. पण या शहरात २४ तासांच्या वेळेतील दोन तास कमी असतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. यामुळे दिवासातील प्रत्येक काम हे वेळेनुसार ठरवली जातात. आपल्यापैकी बहुतेकांची सकाळी उठण्याची, ऑफिसला जाण्याची, दुपारच्या जेवणाची, रात्री घरी येण्याची आणि पुन्हा रात्री जेवून झोपण्याची ठरावीक वेळ ठरलेली आहे. बरेच लोक याच वेळापत्रकानुसार किंवा थोडफार मागे पुढे वेळ पाळतात. घड्याळ सुद्धा 1 नंतर २, २ नंतर ३ ते १२ नंतर १३ वाजत राहतात. पण, जगात असं एक शहर आहे जिथे घड्याळ दिवसभरात दोन्ही वेळेस ११ नंतर १२ वाजत नाही, तर थेट १ वाजतो.
हे घड्याळ कोणत्या शहरात आहे जाणून घेऊ
अनेकांच्या आयुष्यात घडाळ्यातील १२ या आकड्याला विशेष महत्व आहे. भारतात रात्रीचे १२ म्हणजे दुसरा दिवस सुरु होण्यास एक तास बाकी असे मानले असते. तर दुपारचे १२ म्हणजे प्रचंड उष्णता वाढण्यास सुरुवात होणार असे गृहित असते. त्यामुळे रात्री १२ वाजण्याच्या आत घरातील कामं आणि दुपारी १२ वाजण्याच्या आत बाहेरील काम पूर्ण करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पण स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहरातील सर्व घड्याळांमध्ये ११ वाजेपर्यंतचं पॉइंटर आहेत. यामुळे येथील घड्याळांमध्ये ११ नंतर थेट १ वाजतो. यामुळे स्विस घड्याळे जगभरात प्रसिद्ध आहेत. पण जगभरात विकल्या जाणार्या स्विस घड्याळांमध्ये ११ नंतर १२ चा आकडा आहे. पण त्या शहारात असे का आहे असा प्रश्न पडतो. वास्तविक स्वित्झर्लंडमधील सोलोथर्न शहरातील लोकांना ११ क्रमांकावर विशेष आकर्षण आहे. येथील लोक १२ नंबरला महत्त्व देत नाहीत. या कारणास्तव या शहरातील सर्व घड्याळांमध्ये केवळ ११ अंक ठेवण्यात आले आहेत.
सोलोथर्न शहरातील नागरिकाना ११ अंकाचे एवढे आकर्षण का?
सोलोथर्न या स्विस शहरातील घरे आणि दुकानांमधील घड्याळांमध्ये ११ नंतर थेट १ वाजतो. या शहराचा ११ या अंकाशी खूप जवळचा संबंध आहे. विशेष म्हणजे या शहरातील संग्रहालयांची संख्याही केवळ ११ आहे. याशिवाय सोलोथर्न शहरात ११ टॉवर आणि ११ धबधबे आहेत. शहरातील मुख्य चर्च, क्रेसेंट आणि सूस बांधण्यासाठी ११ वर्षे लागली. एवढेच नाही तर या चर्चमधील घंटा आणि खिडक्यांची संख्याही ११ आहे. या शहरातील लोकांना ११ नंबर इतका आवडतो की, ते सोलोथर्न शहराचा वाढदिवसही ११ तारखेला साजरा करतात.