Which state is known as Kohinoor of India: कोहिनूरचे नाव ऐकताच डोळ्यात एक वेगळीच चमक येते, पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात एक असे शहर आहे, ज्याला कोहिनूरचे साम्राज्य म्हटले जाते. भारतात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची खासियत आहे. यापैकी एक राज्य कोहिनूरसाठी प्रसिद्ध आहे. ते कोणते राज्य असू शकते, याचा अंदाज तुम्ही लावू शकता का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील विविधता

भारत आपल्या विविधतेसाठी ओळखला जातो. येथील प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, परंतु यातलंच एक राज्य आपल्या समृद्ध संस्कृती, इतिहास आणि संसाधनांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेकदा त्याला ‘भारताचा कोहिनूर’ असे म्हटले जाते. हे राज्य दुसरे तिसरे कोणते नसून आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशला हे अनोखे शीर्षक का मिळाले आणि ते इतके खास का आहे ते जाणून घेऊया.

हेही वाचा… क्रेडिट कार्डवरून तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत? मग ‘या’ स्टेप्स करा फॉलो

कोहिनूर का म्हटलं जातं?

आंध्र प्रदेशला अनेकदा भारताचा कोहिनूर म्हटले जाते, कारण जगातील प्रसिद्ध कोहिनूर हिरा याच राज्यातून आला असल्याचे मानले जाते. या मौल्यवान रत्नाचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेऊया.

कोहिनूर हे नाव कुठून आले?

कोहिनूर (हिरा) आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेल्या कोल्लूर खाणीतून काढण्यात आल्याचे इतिहासकारांचे मत आहे. काकतिया राजवंशाच्या काळात ही खाण कोहिनूरसह जगातील सर्वात मौल्यवान हिरे तयार करण्यासाठी प्रसिद्ध होती.

हेही वाचा…  रेल्वेचं तिकीट काढलीय, पण ऐनवेळी नाव किंवा तारीख बदलायचीय? मग ‘ही’ माहिती एकदा वाचाच

कोहिनूरचा अर्थ

कोहिनूर हे नाव पर्शियन भाषेतून आले असून, त्याचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होतो. हे नाव हिऱ्याचे तेज आणि सौंदर्य प्रतिबिंबित करते. इतिहासातील त्याचे उच्च मूल्य आणि महत्त्व ते दर्शवते.

आंध्र प्रदेशला भारताचा कोहिनूर का म्हणतात?

आंध्र प्रदेशला भारताचा कोहिनूर म्हटले जाते, कारण प्रसिद्ध कोहिनूर हिरा राज्यातून, विशेषत: गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खाणीतून आला असल्याचे मानले जाते. डायमंडचा समृद्ध इतिहास, नेत्रदीपक सौंदर्य आणि अनेक राज्यकर्त्यांसोबतचे त्याचे संबंध आंध्र प्रदेशला भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग बनवतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohinoor of india which state is known as kohinoor of india do you know dvr