कुंभ मेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. आजपासून कुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे या कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून, जगभरातील ४० कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आयला आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभ आणि महाकुंभ यांच्यातील फरक समजून घेऊ आणि कुंभ किती प्रकारचे असतात, हेदेखील जाणून घेऊ.

कुंभ मेळ्याचे आयोजन चार शहरांत केले जाते; ज्यात हरिद्वार, प्रयागराज, नाशिक व उज्जैनचा समावेश आहे. नाशिक व उज्जैन येथील कुंभ मेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरांत कुंभ, अर्धकुंभ व महाकुंभाचे आयोजन केले जाते. कुंभ मेळा हा दर तीन वर्षांनी असतो, महाकुंभ मेळा दर १२ वर्षांनी असतो आणि महाकुंभ मेळा सर्वांत पवित्र मानला जातो. कुंभ मेळ्याचे चार प्रकार आहेत. पूर्ण कुंभ, अर्ध कुंभ, कुंभ मेळा व महा (महान) कुंभमेळा. त्यातील फरक खालीलप्रमाणे :

Why Market is Falling Today
Why Market is Falling Today: शेअर बाजार आज का कोसळला? जाणून घ्या तीन कारणे…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता; योगी सरकारची तिजोरी भरणार
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
कुंभ मेळ्याचे आयोजन चार शहरांत केले जाते; ज्यात हरिद्वार, प्रयागराज, नाशिक व उज्जैनचा समावेश आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?

कुंभ : कुंभचा अर्थ होतो कलश. प्रत्येक तीन वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिकमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अर्धकुंभ : अर्धचा अर्थ होतो अर्धा. हरिद्वार व प्रयागराज या दोन पवित्र ठिकाणी दर सहा वर्षांनी अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन होते.

पूर्णकुंभ : प्रत्येक १२ वर्षांनी पूर्णकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ- उज्जैनमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन होत आहे. त्याच्या तीन वर्षांनंतर हरिद्वार, त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनंतर प्रयागराज आणि पुन्हा पुढील तीन वर्षांनंतर नाशिक येथे कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते, हे चक्र पूर्ण झाल्यास याला पूर्णकुंभ, असे म्हणतात. याच पद्धतीने जेव्हा हरिद्वार, नाशिक किंवा प्रयागराजमध्ये १२ वर्षांनंतर कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाईल, तेव्हा त्याला पूर्ण कुंभ, असे म्हटले जाईल. हिंदू पंचांगांनुसार देवतांचे १२ दिवस म्हणजे माणसांची १२ वर्षे असतात, असे मानले जाते. त्यामुळे पूर्ण कुंभ मेळ्याचे आयोजनदेखील प्रत्येक १२ वर्षांनी होते.

प्रत्येक १२ वर्षांनी पूर्ण कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

महाकुंभ : मान्यतेनुसार प्रयागराजमध्ये १४४ वर्षांमध्ये एकदा महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. १४४ वर्षेच का? तर १२ गुणिले १२ केले की १४४ होतात. अशी मान्यता आहे की, कुंभ मेळेदेखील १२ असतात, त्यातील चार मेळ्यांचे आयोजन पृथ्वीवर, तर उर्वरित आठांचे आयोजन देवलोकांत केले जाते. या मान्यतेनुसार प्रत्येक १४४ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होते. २०१३ साली प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कारण- त्याच वर्षी १४४ वर्षे पूर्ण झाली होती. आता पुढील कुंभ मेळा १३८ वर्षांनी आयोजित होणार असल्याचे सांगितले जाते.

सिंहस्थ : सिंहस्थचा संबंध सिंह राशीबरोबर आहे. सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास उज्जैनमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. हा योग प्रत्येक १२ वर्षांनंतर येतो. याच प्रकारचा योग घडून आल्यास नाशिकमध्येही सिंहस्थचे आयोजन केले जाते. या कुंभमुळेच ही धारणा प्रचलित झाली की, कुंभ मेळ्याचे आयोजन प्रत्येक १२ वर्षांनी होते; पण हे खरे नाही. कुंभ मेळा उज्जैन सोडल्यास इतर तीन शहरांत तीन-तीन वर्षांनीच आयोजित होतो.

कुंभ मेळ्यासाठी महत्त्वाची ठिकाणे

हरिद्वार : कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार व प्रयागराजमध्ये दोन कुंभ पर्वांमध्ये सहा वर्षांच्या यंत्रात अर्धकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते.

प्रयागराज : मेष राशीच्या चक्रात बृहस्पती किंवा सूर्य आणि चंद्राने मकर राशीत प्रवेश केल्यास अमावास्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते.

कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास आणि मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

नाशिक : सिंह राशीत बृहस्पतीच्या प्रवेशानंतर कुंभ मेळ्याचे आयोजन गोदावरीच्या तटावर नाशिकमध्ये केले जाते. अमावास्येच्या दिवशी बृहस्पती, सूर्य व चंद्र या ग्रहांनी कर्क राशीत प्रवेश केल्यानेही नाशिकमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन होते. या कुंभ मेळ्याला सिंहस्थ म्हणतात कारण- या कार्यकाळात सिंह राशीत बृहस्पतीचा प्रवेश होतो.

हेही वाचा : वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?

उज्जैन : सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशानंतर उज्जैनमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त कार्तिक अमावास्येच्या दिवशी चंद्र व सूर्य एकत्र असताना आणि बृहस्पतीने तुला राशीत प्रवेश केल्यास उज्जैनमध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. यातदेखील सिंह राशीचा समावेश असल्याने याला सिंहस्थ कुंभ मेळा, असे म्हटले जाते.

Story img Loader