How to Check Ladki Bahin Yojana Payment Status in Bank Account : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सरकारकडून दिला जातो. जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले जातात. परंतु, अद्यापही काही पात्र महिलांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. तसंच, अर्जात ज्या खात्याची नोंद केली आहे, त्या बँकेत जाऊन तपासले असता त्या खात्यातही पैसे आलेले नाहीत, अशी स्थिती तुमचीही झाली असेल तर तुमचे पैसे कोणत्या खात्यात गेले? आणि ते कसे तपासायाचे याविषयी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा काही निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार, अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत पात्र ठरवण्यात येणार, बँकेशी आधार लिंक असणं गरजेचं आहे, महिलेच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी गाडी नसावी आदी काही निकष होते. त्यामध्ये बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असणं फार गरजेचं आहे. कारण, तुमचा अर्ज स्वीकारला गेला असला तरीही बँक सिडिंग नसल्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येणार आहेत. तसंच, एकापेक्षा अधिक बँक खाती असतील आणि अधिक खात्यांपैकी कोणतंही खातं सिडिंग झालं असेल तर त्या खात्यातही थेट पैसे जमा होत आहेत. अशावेळी पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे तुमचं कोणतं खातं सिडिंग आहे आणि कोणत्या खात्यात पैसे जाम झालेत, हे कसं तपासायचं ते पाहुयात.

Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Maharashtra Politics Live Updates : “लाडकी बहीण म्हणून नीलम गोऱ्हेंना विधानसभेचं तिकिट द्यावं”, सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sharad pawar harshavardhan patil
शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; व्यासपीठावरूनच म्हणाले, “यांना तुम्ही विधानसभेत पाठवा!”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
shivsena election song
Maharashtra News : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचं निवडणूक गीत लाँच!
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना; आता ‘त्या’ बँकांवर कारवाई होणार

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले? असं तपासा!

  • सर्वात आधी https://uidai.gov.in/en/ यासंकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर खाली असलेल्या My Aadhar वर क्लिक करा.
  • तिसऱ्या कॉलममध्ये Aadhaar Services च्या खाली बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक करा.
  • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पर्याय समोर दिसेल. तिथे तुमचा आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करा, कॅप्चा भरा आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा.
  • आता तुमच्या समोर चौकोनी आकारातील काही पर्याय दिसतील. तिथे Bank Seeding Status वर क्लिक करा.
  • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Congratulations! Your Aadhaar-Bank Mapping has been done असा मेसेज येऊन खाली ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे, त्याची माहिती येईल. तिथे आलेल्या बँकेतच तुमचे पैसे जमा झाले आहेत.

अर्जात भरलेल्या बँक खात्यात पैसे जमा न होता इतर खात्यात पैसे जमा झाल्यास अनेकदा मेसेज येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वरील युक्ती वापरून जर तुम्ही प्रक्रिया केलीत तर तुम्हाला पैसे कोणत्या खात्यात गेलेत हे समजायला सोपं पडेल. त्यामुळे लगेच जाऊन त्या बँकेत तुमचं पासबूक तपासून या.

लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांका कोणता?

सिडिंग बँक खात्यातही पैसे जमा झाले नसतील तर १८१ या हेल्पलईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.