Interesting Facts About Laptop Charger : आजकाल जवळपास सर्वच घरांमध्ये लॅपटॉपचा वापर केला जातो. ऑफिस, कॉलेज आणि इतर अनेक कामांच्या अनुषंगाने लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लॅपटॉप वापरताना त्याची बॅटरी संपली की, ती चार्ज करावी लागते. लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी ही रोजची गोष्ट आहे. पण, तुम्ही कधी लॅपटॉप चार्ज करताना पाहिलं आहे का की, लॅपटॉप चार्जर दोन भागांत विभागलेला असतो. पण, असे का ते तुम्हाला माहितेय का? इतकेच नाही, तर या चार्जरमधील एका भागामध्ये ब्लॅक बॉक्स का असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? लॅपटॉप चार्जरबाबत असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे खरे कारण सांगणार आहोत.

लॅपटॉप चार्जर दोन भागांत का असतो? (Laptop Charger Hacks)

लॅपटॉप चार्जरच्या एका भागामध्ये ब्लॅक बॉक्स असतो, ज्याला फेराइट बीड, फेराइट चोक किंवा फेराइट सिलिंडर, असे म्हटले जाते. वास्तविक हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. (what are the two parts of a laptop charger called) हे सर्किट लॅपटॉपपर्यंत पोहोचणारी हाय फ्रीक्वेन्सी कमी करण्याचे कार्य करते आणि त्यामुळे डिव्हाइस खराब होण्याची शक्यता कमी झाल्याने लॅपटॉपचे कोणतेही नुकसान होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन लॅपटॉपचा चार्जर दोन भागांत बनवला जातो.

Phone pay machine desi jugaad video
गाणी ऐकण्याची हौस म्हणून ‘फोन पे’ मशीनला बनवून टाकले स्पीकर; जुगाड VIDEO पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Funny slogan written behind indian trucks Photo goes viral on social media
PHOTO: म्हणून ट्रक चालकांचा नाद करु नये; ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज, वाचून सगळेच लांब जाऊ लागले
upi or upi wallet which payment mode is more safe and secure in 2024 know all about it
UPI आणि UPI Wallet मधला फरक तुम्हाला माहितीये का? कोणती पद्धत आहे अधिक सुरक्षित? जाणून घ्या
Nikki Tamboli And Pratik Sahajpal
प्रतीक सहजपालबरोबरच्या नात्यावर निक्की तांबोळीचे स्पष्टीकरण; म्हणाली, “तुमची जितकी मैत्री…”
buffalo Viral Video
‘भावा, कर्म तुला सोडणार नाही…’ तरुणांनी म्हशींबरोबर घेतला पंगा, पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक
Women Making Karwa Chauth Viral Video
‘बापरे! तिने नवऱ्याच्या मानेवर पाय ठेवून…’ करवा चौथ स्पेशल रील बनवण्यासाठी महिलेचा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
momos dumplings different from one another
मोमोज, डिम सम आणि डंपलिंगमध्ये नेमका काय फरक असतो?

Read More News On Tech : Apple Price Cut: iPhone स्वस्त झाले; कोणतं मॉडेल, किती दर घटले? वाचा सविस्तर वृत्त!

लॅपटॉप चार्जरमध्ये ब्लॉक बॉक्स का असतो?

लॅपटॉप चार्जरला दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागलेला असतो आणि त्याच्या एका भागामध्ये लॅपटॉपचा ब्लॅक बॉक्स असतो. या ब्लॅक बॉक्सला लॅपटॉपची संरक्षणात्मक ढाल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हा बॉक्स लॅपटॉपचे संरक्षण करतो. कारण- हा बॉक्स नसता, तर हाय रेडिओ फ्रीक्वेन्सीमुळे लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये समस्या उदभवू शकल्या असत्या. आता तुमच्या लक्षात आले असेल की, बहुतेक कंपन्यांच्या लॅपटॉप चार्जरमध्ये एक गोलाकार किंवा चौकोनी आकाराचा बॉक्स असतो. तुम्ही या बॉक्सला लॅपटॉपचे संरक्षक आवरणदेखील म्हणू शकता. पण, ॲपलच्या लॅपटॉप चार्जरमध्ये असा बॉक्स नसतो. या कंपनीच्या लॅपटॉप चार्जरचा प्लगच एका मोठ्या बॉक्ससारखा आहे आणि इतर कंपन्यांच्या चार्जरमधील ब्लॅक बॉक्स जे काम करतो तेच काम हा प्लग करीत असतो.