तुमचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक झाले आहे का? नसेल तर तुमचे पॅन आधारशी लिंक करण्याची घाई करा. कारण, ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा पॅन नंबर कार्यरत रहाणार नाही. तसेच तुमचे KYC देखील रद्द होईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही पॅन लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण ३१ तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास ते अवैध ठरवलं जाणार आहे. ज्यामुळे त्याचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला वापर करता येणार नाही.

पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षी सरकारने मुदत वाढवून देण्यास नकार दिला होता. तरीही चर्चेअंती सरकारकडून पुन्हा १ वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे ३१ मार्च २०२३ ही शेवटची मुदत आहे. दिलेल्या तारखेपर्यंत जर कोणी आधार पॅन लिंक केलं नाही १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा- PAN Card for Child: लहान मुलांचे पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र

३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर होणारे नुकसान जाणून घ्या.

  • तुमचा पॅन कार्ड नंबर कार्यरत रहाणार नाही.
  • तुमचे KYC देखील रद्द होणार.
  • Mutual Fund मधील SIP च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक थांबणार.
  • तुम्ही 15G आणि 15H फाँर्म भरू शकणार नाही.
  • तुम्हाला २०% इन्कम टॅक्स भरावा लागणार.

त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचं असेल तर आजच तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करा. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करुन तुमचे पॅन आणि आधारकार्ड लिंक आहे की नाही ते तपासू शकता.

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status

तुमचे पँनकार्ड आणि आधारकार्ड लिंक नसल्यास पुढील लिंकचा वापर करुन लिंक करून घ्या.

To link your PAN with Aadhaar –

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरता येतात. या ट्रिक्सचा वापर तुम्ही ३१ मार्च २०२३ नंतरही करु शकता.

  • पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी ‘हे’ करा
  • आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर Tax e-Services हे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा. PAN subcategory च्याखाली ‘Know your PAN’ हे ऑप्शन दिसेल.
  • त्याच्या बाजूला असलेल्या रकान्यातील बाणांवर टॅप करा.
  • त्यानंतर पोर्टलवरील ई-फायलिंग लिंकवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर जाण्यासाठी तेथे आवश्यक तपशील भरा.
  • तपशील भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यात पॅन कार्डच्या स्थितीबाबतची माहिती दिसेल.

Story img Loader