गर्भारपणात महिलांच्या शरीरात बरेच बदल जाणवतात. यातले काही बदल चकित करणारे, तर काही अस्वस्थ करणारे असतात. महिलांना गर्भारपणात होणारे बदल हे त्या गर्भधारणेचा भाग आहेत, महत्त्वाचं म्हणजे हे सर्व बदल सामान्य आहेत. महिलांच्या पोटावर काळ्या रेषा दिसणे, हा देखील गर्भधारणेत होणाऱ्या बदलांचा एक भाग आहे. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये याबद्दल तपशीलवार सांगण्यात आलं आहे. या रेषेला लिनिया निग्रा असं म्हणतात.
लिनिया निग्रा अर्थात ब्लॅक लाइन म्हणजे काय?
लिनिया निग्रा ही एक उभी रेषा असते, जी गर्भधारणेदरम्यान महिलांच्या पोटाच्या त्वचेवर दिसते. याला गर्भ रेषाही म्हणतात. नाभीपासून ते प्यूबिक एरियाच्या शेवटपर्यंत ही रेषा गर्भधारणेदरम्यान दिसून येते. कधीकधी ती नाभीपासून वरच्या दिशेने पसरते. सामान्यत: सर्व महिलांना ही रेषा असते, पण ती गर्भधारणेच्या दुसर्या आणि तिसर्या महिन्यापासून लक्षात येऊ लागते.
कोणत्या लोकांमध्ये लिनिया निग्रा दिसते?
जवळपास ८०% गर्भवती महिलांमध्ये लिनिया निग्रा दिसते. या रेषेचा रंग आपल्या त्वचेच्या रंगावर अवलंबून असतो, त्यामुळे सावळा वर्ण असलेल्या लोकांमध्ये ती गोऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त स्पष्टपणे दिसते.
पोटावरची ब्लक लाइन कधी जाते?
जेव्हा आपल्या हॉर्मोन्सची पातळी सामान्य पातळीवर परत येते, तेव्हा लिनिया निग्रा गर्भधारणेनंतर फिकट होते. ही रेषा काही आठवडे किंवा महिन्यांत हळूहळू फिकी पडू लागते आणि बऱ्याच महिलांच्या पोटावरील ही रेषा नाहिशी होते. काहींना मात्र ही रेषा मिटण्यास वेळ लागू शकते. काहींना ती कायमस्वरुपीही राहू शकते. पण, ही रेष पूर्णपणे सामान्य असून त्याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. या रेषेचे कोणतेही नुकसान नाहीत.
गर्भधारणेदरम्यान काळी रेषा लांब का होते?
गर्भधारणेदरम्यान, शरीर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हॉर्मोन्सचे उच्च स्तर रिलीज करते. हे हॉर्मोन्स गर्भावस्थेसाठी शरीराला तयार करण्यासाठी आणि गर्भाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. या हॉर्मोन्सचे काही वेळा काही दुष्परिणाम देखील दिसतात. या हॉर्मोन्स प्रमाण वाढल्याचं मेलेनिनचं उत्पादन वाढू लागतं. हे गर्भधारणेदरम्यान त्वचेच्या हायपरपिगमेंटेशनचे कारण बनते.
ब्लॅक लाइन कशी घालवायची?
ही रेषा शरीरावर तयार होण्यापासून आपण थांबवू शकत नाही. गर्भावस्थेदरम्यान हॉर्मोनल क्रियांमुळे दिसून येणार्या या काळ्या रेषांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. यासाठी वैद्यकीय सल्ला देखील आवश्यकताही नाही. पण, डिलीव्हरीनंतरही ती बदलत नसेल किंवा त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
गर्भारपणा आणि स्तनपान करत असताना महिलांना त्वचेच्या कोणत्याही उपचारासाठी परवानगी दिली नाही. गर्भधारणेदरम्यान ही काळी रेषा पोटावर दिसणं हा एक सामान्य बदल आहे. ती कालांतराने पूर्णपणे नाहिशी होईल, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.