PAN Card: पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सरकारने यापूर्वीच पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले होते. आधार पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. गेल्या काही महिन्यांपासून पॅन आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता लिंक प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास आयकर विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड बाद करण्यात येईल. असे झाल्यास तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतील. त्यामुळे आजच तुमचे पॅन कार्ड लिंक करा.

आयकर विभागाने केले ट्वीट

Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचा आरोप, “आपने बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना बनावट आधार कार्ड..”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Farmers sat bara will now linked to Aadhaar to avoid fraud
शेतकऱ्यांचे सातबारे आधारशी संलग्न; फसवणुकीचे प्रकार टळणार
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…
How to park a car fell down from first floor car parking fail video viral on social media car parking tips
पुण्यात पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरुन कार कोसळली; तुमच्याबरोबर ‘हे’ घडू नये म्हणून गाडी पार्क करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
Travelling on ST without a smart card is difficult Pune news
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
How To Check Outstanding Loans Linked To PAN Card Online in Marathi
PAN Card Loan Details : पॅनकार्डच्या मदतीने तुमचं थकीत कर्ज कसं तपासता येतं? जाणून घ्या तीन खास टीप्स
how do you apply for a minor PAN card
Pan Card : लहान मुलांना पॅन कार्डची गरज असते का? काय आहेत त्याचे फायदे; घ्या जाणून

आयकर विभागाने ट्वीट करत पॅनशी आधार लिंक न केलेल्या नागरिकांना इशारा दिला आहे. आयकर कायदा १९६१ नुसार सर्व पॅन धारकांसाठी ३१ मार्च २०२३ ही तारीख पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. जर पॅन आधारशी लिंक केले नसेल तर तुमचे पॅनकार्ड बाद होणार असे या ट्वीटमध्ये नमूद केलेले आहे.

(आणखी वाचा : तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्डची नोंद आहे? ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून लगेच जाणून घ्या )

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ३० जूनपासून आधार पॅनशी लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारला होता. दंड भरल्याशिवाय कोणीही पॅन आधारला लिंक करू शकणार नाही. ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार पॅन लिंक प्रक्रिया सुरू राहिल त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या नागरिकांचे पॅन कार्ड ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले जाणार नाही असे सर्व पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२B अंतर्गत तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.

Story img Loader