How Much Gold Reserves In India: वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या (WGC) नव्या आकडेवारीनुसार, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश म्हणून उदयास आला आहे. डब्ल्यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, या यादीत भारत नवव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या साठ्यात भारत सौदी अरेबिया आणि युनायटेड किंगडमच्या पुढे आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेत तब्बल ८,१३३.४६ टन सोन्याचा साठा आहे. ज्याचे मूल्य ४,८९,१३३ दशलक्ष डॉलर्स इतके आहे. तर साधारण ३,३५२ टन सोन्याच्या साठ्यासह जर्मनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा असलेला देश ठरला आहे. या यादीत इटली, फ्रान्स आणि रशिया यांनी अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे. तर २,१९१.५३ टन सोन्यासह चीन सहाव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या यादीनुसार, भारताकडे ८०० टन सोन्याचा साठा आहे, ज्याचे मूल्य ४८,१५७.७१ दशलक्ष डॉलर इतके आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

रशियाचा सोन्याच्या साठ्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, गोठवलेल्या सोन्याच्या साठ्याचा वापर आता विकसनशील देशांच्या मदतीसाठी, तसेच हवामानाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आवश्यक निधीसाठी केला जाऊ शकतो का याचा विचार करत असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाच्या हवामान दूताने COP28 शिखर परिषदेत सांगितले की, या निर्णयामुळे विकसित आणि विकसनशील देशांमधील हवामान बदल हाताळण्याबाबत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधील अंतर कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, हा प्रयत्न मॉस्कोचे गोठलेले सोन्याचे साठे ताब्यात घेण्यापासून पाश्चिमात्य देशांना रोखण्यासाठी ‘शक्य ते सर्व’ करण्याचा मॉस्कोचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सुद्धा असावा असे अंदाज बांधले जात आहेत.

सर्वाधिक सोन्याचा साठा असलेल्या देशांची यादी

क्रमांकदेशसोन्याचा साठा (टन)सोन्याच्या साठ्याची किमंत (दशलक्ष डॉलर)
1.यूनाईटेड स्टेट्स8,133.46489,133.74
2.जर्मनी3,352.65201,623.07
3.इटली2,451.84147,449.64
4.फ्रान्स2,436.88146,551.80 
5.रशिया2,332.74140,287.50
6.चीन2,191.53131,795.43
7.स्वित्झर्लंड1,040.0062,543.91
8.जपान845.9750,875.51
9.भारत800.78 48,157.71 
10.नेदरलँड612.4536,832.02
11.तुर्की478.9728,804.60
12.तायवान423.6325,476.21
13.युझबेकिस्तान383.8123,081.97
14.पोर्तुगाल382.6323,010.89
15.पोलंड333.7120,068.84
16.सौदी अरेबिया323.0716,933.64
17.युके 310.2918,660.18
18.कझाकिस्तान309.3818,605.42
19.लेबनॉन286.8317,249.75
20.स्पेन281.5817,311.60

देशांकडे सोन्याचा साठा का असतो?

प्रत्येक देशात सोन्याचा साठा असण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्याचे मूल्य हे दीर्घकाळ स्थिर असते. या मौल्यवान धातूने यापूर्वी अनेक देशांच्या चलनाच्या मूल्याला आधार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही देश सोन्याच्या साठ्याकडे त्यांच्या चलनाची स्थिरता राखण्याचे साधन म्हणून पाहतात.

देश सोन्याचा साठा ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे विविधता. राष्ट्रे त्यांच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकतात आणि इतर मालमत्तेच्या मूल्यातील चढउतारांशी संबंधित जोखीम कमी करू शकतात. सोन्याची किंमत यूएस डॉलरच्या व्यस्त प्रमाणात कमी अधिक होते. जेव्हा डॉलरचे मूल्य घसरते तेव्हा सोन्याचे दर वाढतात. परिणामी, बाजारातील अस्थिरतेच्या काळात मध्यवर्ती बँका त्यांच्या साठ्याचे रक्षण करू शकतात.

हे ही वाचा << Ramayan Quiz: तुम्हाला रामायण किती माहीत आहे? ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जिंका आकर्षक बक्षीस

तर, काही देश या मौल्यवान धातूचा त्यांच्या व्यापारातील असंतुलन सोडवण्यासाठी किंवा कर्जासाठी तारण म्हणून वापर करतात. आर्थिक मंदीच्या काळात, सोन्याचे मूल्य वाढते आणि त्यामुळे अशा संकटांमध्ये सोने अर्थव्यवस्थेचे संरक्षक म्हणून काम करते.

Story img Loader