प्रवासादरम्यान अनेकदा आपण पर्स किंवा महत्त्वाच्या वस्तू हरवतो, पण तुम्ही परदेशात असाल आणि तिथे पासपोर्ट हरवला तर? अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला टेन्शन येऊ शकते. पण, त्वरित तक्रार केल्याने तुमची महत्त्वाची प्रवास कागदपत्रे परत मिळवू शकता. ही प्रक्रिया ऑनलाइन सहज पूर्ण करू शकता. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि परदेशात तुमचा पासपोर्ट हरवला तर अशा परिस्थितीत काय करावे हे माहीत असले पाहिजे. अशा परिस्थितीत काय करावे याबाबत येथे सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांकडे तक्रार दाखल करा (File a Police Report)

तुमचा पासपोर्ट हरवला किंवा चोरीला गेला आहे हे लक्षात आल्यानंतर तुमचे पहिले पाऊल म्हणजे पोलिस तक्रार दाखल करणे. तुम्ही हे जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये किंवा ऑनलाइन तक्रार करू शकता. ही तक्रार पासपोर्ट हरवल्याची औपचारिक नोंद म्हणून काम करते, जो दूतावासाच्या (embassy) प्रक्रियेसाठी आणि नवीन पासपोर्ट किंवा आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे. पोलिस तक्रार केल्याची मूळ प्रत जपून ठेवा, कारण अधिकारी पुनर्प्राप्ती प्रक्रियेदरम्यान (recovery process) पुन्हा त्याची पडताळणी करू शकतात.

जवळच्या भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधा (Contact the Nearest Indian Embassy or Consulate

पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, जवळच्या भारतीय दूतावास (Indian Embassy) किंवा वाणिज्य दूतावासाशी (Consulate) संपर्क साधा. या संस्था परदेशात पासपोर्ट हरवणे यासह नागरिकांच्या इतर समस्यांना सोडवण्यासाठी मदत करतात. ते तुम्हाला नवीन पासपोर्ट किंवा आपत्कालीन प्रमाणपत्र (EC) मिळविण्यासाठी मार्गदर्शन करतील, जे तुम्हाला तात्पुरते भारतात परत प्रवास करण्यास अनुमती देते.

नवीन पासपोर्ट किंवा आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करा (Apply for a New Passport or Emergency Certificate)

नवीन पासपोर्ट (New Passport) : जर तुम्ही नवीन पासपोर्ट निवडला तर प्रक्रियेस सुमारे एक आठवडा लागू शकतो. तुमच्या सद्य रहात असलेल्या पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि पोलिस अहवाल यासह आवश्यक कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा.
आपत्कालीन प्रमाणपत्र (Emergency Certificate) : जर तुम्हाला लवकर भारतात परतायचे असेल तर आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. ही तात्पुरती कागदपत्रे घरी परतण्याचा प्रवास करण्यास परवानगी देते, परंतु तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला नवीन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागतो

तुमच्या व्हिसासाठी पुन्हा अर्ज करा (Reapply for Your Visa)

तुमचा पासपोर्ट हरवल्यास तुम्हाला तुमच्या व्हिसासाठी जारी करणाऱ्या देशाच्या दूतावासात किंवा ऑनलाइन पुन्हा अर्ज करावा लागेल. विशिष्ट पात्रता तपासा, कारण त्या वेगवेगळ्या असू शकतात.

तुमच्या फ्लाइटचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करा (Reschedule Your Flight)

जर तुम्ही तुमची कागदपत्रे लवकर परत मिळवू शकत नसाल तर पर्यायी प्रवास तारखांवर चर्चा करण्यासाठी तुमच्या एअरलाइनशी संपर्क साधा. विशेषतः जर तुमच्याकडे तुमची परिस्थिती सिद्ध करण्यासाठी पोलिस अहवाल असेल तर ते तुम्हाला मदत करू शकतात.

प्रवास विम्याचा वापर करा (Utilise Travel Insurance)

जर तुम्ही प्रवास विमा खरेदी केला असेल, तर तोटा तुमच्या प्रदात्याला (provide) कळवा. अनेक पॉलिसी हरवलेल्या कागदपत्रांशी संबंधित खर्च कव्हर करतात, ज्यामध्ये अर्ज शुल्क आणि फ्लाइट रीशेड्युलिंग खर्च यांचा समावेश आहे.

विमा दाव्यांसाठी रेकॉर्ड ठेवा (Keep Records for Insurance Claims)

पोलिस अहवाल आणि पासपोर्ट हरवल्यामुळे झालेल्या खर्चाशी संबंधित कोणत्याही पावत्यांसह सर्व संबंधित कागदपत्र व्यवस्थित जपून ठेवा.