Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानंदेखील कंबर कसली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावं, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता मोबाईलवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदान केंद्र शोधताना ऐन वेळी गोंधळ होऊ नये म्हणून आयोगानं हे पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाइन’ या अॅपवर तुम्हाला मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र लगेच शोधता येणार आहे.

‘वोटर हेल्पलाइन’ अॅपवर मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र कसं शोधायचं?

सर्वांत आधी प्ले स्टोअरमधून ‘वोटर हेल्पलाईन’ हे अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही नवीन युजर असाल, तर सर्वांत आधी न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. किंवा तुम्ही गेस्ट युजर म्हणूनही लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला ‘search your name in electoral roll’ असा एक सर्च बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक करा.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
How to Check Name in Voters List in Marathi
How to Check Name in Voters List : विधानसभेचा रणसंग्राम! मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? यादीत नाव कसं नोंदवाल? जाणून घ्या
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज

सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी चार पर्याय मिळतील. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही तुमची माहिती मिळवू शकता. त्याशिवाय तुम्ही मतदान कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन करू शकता. तसेच तुमची वैयक्तिक माहिती भरून किंवा मतदान कार्डावरील EPIC क्रमांक भरून, तुम्हाला मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल.

हेही वाचा – रेल्वेमधले डायनॅमिक तिकीट दर म्हणजे काय? प्रवाशांच्या मागणीनुसार वाढत जातात तिकिटांच्या किंमती…

पहिला पर्याय (मोबाईल क्रमांक) : पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल. मोबाईल क्रमांक भरताच तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, मतदान यादीतील क्रमांक व मतदान केंद्र, अशी संपूर्ण माहिती मिळेल.

दुसरा पर्याय (मतदान कार्डावरील क्यूआर कोड) : मतदान कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून, तुम्हाला थेट मतदान यादीतील क्रमांक आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळेल.

तिसरा पर्याय (वैयक्तिक माहितीद्वारे) : जर तुम्हाला पहिले दोन पर्याय वापरताना अडचण येत असेल, तर तुम्ही तिसऱ्या पर्यायाचा वापर करू शकता. त्यासाठी ‘search by details’ यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि आडनाव, तुमच्या वडील किंवा आईचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा व मतदारसंघ, अशी संपूर्ण माहिती भरावी लागेल. ही माहिती भरताच तुम्हाला तुमचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांक मिळेल.

चौथा पर्याय (EPIC क्रमांक) : तुम्ही EPIC क्रमांक भरूनही मतदान केंद्र आणि मतदार यादीतील क्रमांकाविषयी माहिती मिळवू शकता.

हेही वाचा – तुम्ही UPI AutoPay वापरता का? दर महिन्याला पैसे आपोआप कापले जातात का? UPI AutoPay कसे थांबवायचे? ते जाणून घ्या…

वेबसाईटवर मतदान यादीतील नाव कसं शोधायचं?

तुम्हाला सर्वांत आधी तुम्हाला electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या लिंकवर जाताच तुम्हाला एका पेजवर तुमचे नाव, वडिलांचे नाव/पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागेल आणि मग ती संबंधित यादी उघडेल. त्याशिवाय तुम्ही EPIC किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारेही मतदार यादीतील तुमचे नाव सोधू शकता.

EPIC क्रमांक आणि राज्य निवडून, तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळू शकेल. मतदार यादीतील नाव शोधण्याचे दोन्ही पर्याय तुम्ही electoralsearch.eci.gov.in ला भेट दिल्यावर सर्वांत वर दिसतील. या प्रकारे तुम्ही विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान यादीत तुमचे नाव शोधू शकता.

Story img Loader