करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबद्दल मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होता. सोशल मिडियावर यासंदर्भातील वेगवेगळ्या तारखांबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही चिंता वाढली होती. मात्र आता मंडलळानेच बारावीचा निकाल १६ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मंडळाने हा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार आहे निकाल.
निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?
> http://www.mahresult.nic.in
> http://www.hscresult.mkcl.org
> http://www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.
असा पाहा निकाल –
> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
> आसनक्रमांक टाका
> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
त्याचबरोबर http://www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.
यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे.
किती परीक्षा केंद्रांवर झाली परीक्षा – ३ हजार ३६
’नोंदणी केलेले विद्यार्थी – १५ लाख ५ हजार २७
परीक्षार्थी मुले – ८ लाख ४३ हजार ५५२
परीक्षार्थी मुली – ६ लाख ६१ हजार ३२५
अपंग विद्यार्थी – ६ हजार ६५७, तृतीयपंथी विद्यार्थी – १५०
किती भरारी पथके होती तैनात – २७२
किती कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये झाली परीक्षा – ९ हजार ९२३
’शाखानिहाय विद्यार्थी
विज्ञान (५ लाख ८५ हजार ७३६)
कला (४ लाख ७५ हजार १३४)
वाणिज्य (३ लाख ८६ हजार ७८४)
व्यावसायिक अभ्यासक्रम (५७ हजार ३७३)