महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक कायमच देशपातळीवर केलं जातं. महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police ) हे वेगवेगळ्या गु्न्ह्यांची उकल त्यांच्या चातुर्याने आणि बुद्धिकौशल्याने करत असतात. या महाराष्ट्र पोलिसांचं जे बोधचिन्ह आहे त्या बोधचिन्हावर एक उक्ती कायम पाहण्यास मिळते जी असते सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! याचा नेमका अर्थ काय? हे आपण आता समजून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात १० पेक्षा जास्त आयुक्तालयंं

महाराष्ट्र भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे. महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक पोलीसदल ( Maharashtra Police ) आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय ( Maharashtra Police ) पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात १० हून अधिक आयुक्तालयं आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत.

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे अनेक गुन्ह्यांची उकल

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांची पोलीस म्हणून असलेली प्रतिमा ही देखील उत्तम आहे. महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police ) असोत किंवा मुंबई पोलीस त्यांनी आजवर अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. तसंच समाजात ज्यांच्यावर अन्याय झाला अशा अनेक घटकांना न्याय मिळवून दिला आहे. पीडित कुणीही असो त्याला मदत करणं हे पोलीस त्यांचा धर्म समजतात आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम पोलीस करत असतात. एवढंच नाही, गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी आणि इतर मोठ्या सणांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर ( Maharashtra Police ) असते.

महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ नेमका काय? (फोटो सौजन्य-एक्स)

सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणायचा अर्थ नेमका काय?

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबध्द आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असतात. राज्याचं पोलीस मुख्यालय मुंबईत आहे. सद् रक्षणाय सद् म्हणजे चांगली व्यक्ती, सज्जन व्यक्ती. खल म्हणजे दुर्जन व्यक्ती वाईट प्रवृत्तीची किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा बिमोड करणं, बंदोबस्त करणं त्यांना शिक्षा करणं असा पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे.

हे पण वाचा- स्वसंरक्षणार्थ…

कर्तव्य तत्पर पोलीस ही महाराष्ट्र पोलिसांची ओळख

एरवीही नेत्यांचा बंदोबस्त करणं असेल, इतर सामाजिक गोष्टींमधली कर्तव्यं असतील पोलीस त्यांचं काम चोखपणे बजावताना दिसून येतात. पोलिसांवर असलेली जबाबदारी आणि त्यांची कर्तव्यं पाळताना दिसून येतात. कर्तव्य तत्पर अशी महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा निर्माण झाली आहे त्यामागे त्यांची अपार मेहनत आणि कायम नागरिकांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra police logo sentence do you know the meaning of it scj