Maharashtra Police Ranks Constable to DGP : महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना १८२७ साली झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ब्रिटिश राजवटीत या पोलीस दलाची सुरुवात करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस दलाची रचना विविध विभागांमध्ये विभागलेली आहे, जसे की गुन्हेगारी शाखा, महिला शाखा, सायबर क्राइम, वाहतूक विभाग इत्यादी. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबईत आहे आणि राज्यभरात अनेक पोलीस ठाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागाची रचना विविध स्तरांमध्ये विभागली आहे, ज्यामध्ये मुख्यालय, जिल्हा स्तर, आणि स्थानिक स्तर यांचा समावेश आहे.

राज्य पोलीस महासंचालक (DGP) हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात, जे संपूर्ण राज्यात पोलीस दलाचं नेतृत्व करतात. तर अतिरिक्त महासंचालक (Addl. DGP) हे विविध विभागांचं नियंत्रण आणि देखरेख करतात. प्रादेशिक पोलीस महानिरीक्षक (IG) विविध विभागांमध्ये विभागीय कार्यांचा समन्वय साधतात. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) हे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाचा कारभार सांभाळतात. त्यांच्याबरोबर पोलीस उपअधीक्षकही असतात. जिल्ह्यातील वेगवेगळे विभाग या उपअधीक्षकांना विभागून दिलेले असतात. अनेक पोलीस ठाणी ही पोलीस उपाधीक्षकांच्या अंतर्गत येतात. तर पोलीस निरीक्षक हे पोलीस ठाण्याचे प्रमुख असतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात काही पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व पोलीस नाईकही असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात.

Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
maaharashtra assembly election 2024 six retired officers are looking trying their luck in election
सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध
MLA Rohit Pawar alleged that MLAs gave contracts in Municipal Corporation to their relatives
पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हे ही वाचा >> सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभाग काय आहे? या विभागाचे मुख्य काम कोणते?

महाराष्ट्र पोलीस दलातील पदं

  • पोलीस महासंचालक (डीजीपी – Director general of police)
  • अतिरिक्त पोलीस महासंचालक (अ‍ॅडिशनल डीजीपी – Additional Director general of police)
  • पोलीस महानिरीक्षक (आयजी – Inspector general of police)
  • पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी – Deputy inspector general of police)
  • वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी – Senior superintendent of police)
  • पोलीस अधीक्षक (एसपी – superintendent of police)
  • पोलीस उपाधीक्षक (डीएसपी – Deputy superintendent of police)
  • सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी – Assistant superintendent of police)
  • पोलीस निरीक्षक (पीआय – Police Inspector)
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय – Assistant Police inspector)
  • पोलीस उपनिरीक्षक (एसआय – Sub-inspector)
  • सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय – Assistant sub-inspector)
  • हेड कॉन्स्टेबल – Head constable
  • पोलीस नाईक – Police Naik
  • पोलीस कॉन्स्टेबल – Police constable

हे ही वाचा >> World’s First Metro: मुंबई-पुण्यात नव्या मेट्रो लाईनची चर्चा; पण जगात पहिली मेट्रो कधी व कुठे सुरू झाली माहितीये? वाचा मेट्रोचा ‘बायो-डाटा’!

महाराष्ट्र पोलीस दलाची वेगवेगळी कामे

कायदा आणि सुव्यवस्था: जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करणे.
गुन्हेगारी अन्वेषण: गुन्हेगारांचे अन्वेषण आणि अटक करणे.
महिला सुरक्षा: महिलांच्या हक्कांचे रक्षण करणे.
सामाजिक जागरूकता : जनतेला कायद्याबद्दल जागरूक करणे.